माय डियर थोरो ♥️
माय डियर थोरो गुरुजी ♥️
शि.सा.न.वि.वि
कसं काय ? मजेत ना ? I Know की
तुम्ही जेथे सुद्धा असाल तेथे सुखी आणि समाधानीच असाल. तेथे सुद्धा तुम्ही काहीतरी युनिक आणि हटकेच करत असणार ही मला खात्री आहे.कारण तुमचं हयात असतानाचा अवघ्या 43 वर्षाचा आयुष्य बघितल्यावर तुम्ही किती अफलातून आणि ग्रेट होता याची प्रचिती आता येतं आहे.पृथ्वीतळावर तुम्ही ज्याप्रमाणे जगला जगला,ठीक त्याप्रमाणे तुम्ही तेथे सुद्धा असाल हे मी खात्रीपूर्वक सांगू शकतो.तुमचं इतरांपेक्षा वेगळं सच्च्यापणाने जगणं,वागणं, आगळवेगळं प्रयोग करणं,निसर्गाबद्दल असलेली तुमची काळजी/ओढ,तुमचं कमालीचं निरीक्षण, तुमचे भन्नाट विचार आणि एकंदरीत तुमचं संपूर्ण व्यक्तिमत्त्व आज साऱ्या जगाला कळालं आहे.अमेरिकन असून सुद्धा संपूर्ण जगाला आपलासा वाटणारा तुमच्यासारखा लेखक,विचारवंत आणि निसर्गवादी पुन्हा होणे नाही.हे सर्वांना कळून चुकलंय.
आपण जरी एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात होऊन गेला पण तरीही आपले विचार आजच्या युगात पूर्वीपेक्षा जास्त प्रासंगिक आहेत.त्याकाळापेक्षा आजच्या काळात आपल्या विचाराची जास्त गरज विश्वाला आणि समस्त मानवजातीला आहे.आजच्या स्वार्थी मानवाच्या हाताने निसर्गाचा होत चाललेला वऱ्हास थांबवण्यासाठी मानवाला आपल्या विचारांना समोर ठेऊनच चालावे लागणार आहे.निसर्गाशी तादात्म्य पावणारे समाजजीवनच खऱ्या अर्थाने सुखीसंपन्न असते आणि सुखी व संपन्न जीवनाची माणसाला, समाजाला नितांत गरज आहे. ही भूमिका घेऊन जेव्हा मानव चालेल तेव्हा खऱ्या अर्थाने मानव या पृथ्वीवर टिकू शकतो. गुरुजी आपल्या विचारांची महती आज करोडो लोकांनी मान्य केली आहे.आपल्या विचारांची शक्ती असंख्य जणांना पर्यावरण/निसर्गाकडे ओढण्याचा काम करत आहे.तुम्हाला जाऊन जरी आज 190 वर्षे लोटत आली असली तरीही तुमच्या विचारांचे महत्व थोडे सुद्धा कमी झालेले नाहीत तर अजून कितीतरी पटीने वाढले आहे.
आज माझ्या सारख्या युवकाला आपले विचार आगळं वेगळं,साच्यातून बाहेर निघून हटके पध्दतीने जगण्याची प्रेरणा देत आहेत..निसर्गाकडे ओढत आहेत.खऱ्या अर्थाने माणुसकीला प्राधान्य द्यायला शिकवत आहेत.धावपळीच्या व स्पर्धेच्या या युगात आपल्या विचारांनी मला खूपच मदत केली आहे.माझ्या गरजा आता फार कमी झाल्या आहेत.विविध संसाधनांची आता मला कुठलीही लालसा राहिली नाही.श्रीमंत होण्याचं स्वप्न मी आता कधीही बघत नाही.मनातील स्वार्थी विचार कोठेतरी पळून गेले आहेत.जीवनाचा खरा अर्थ मला काही प्रमाणात तरी कळालं आहे.जगाच्या स्पर्धेत आता मला सहभागी व्हावं असं वाटतं नाही.मनाला वाटेल तसचं जगायचं आहे.मन,इच्छा मारून मला जगायचं नाही.कारण मला आता खऱ्या अर्थाने जगायचं आहे.एका आयुष्यात असंख्य आयुष्य जगायचं आहे.भरपूर वाचन,लिखाण,भटकंती करायची आहे.असंख्य माणुसकीला प्राधान्य देणारी माणसं जोडायची आहे.प्रत्येकाच्या सुखात नसलो तरी दुःखात सहभागी व्हायचं आहे.निसर्गावर मनापासून भरभरून प्रेम करायचं आणि निसर्गातील वेगवेगळ्या ऋतुचा आस्वाद घ्यायचा आहे.
आणि शेवटी आपल्या सारखं समाधानी होऊन या विश्वाचा निरोप घ्यायचं आहे.
इत्यादी माझे असंख्य विचार,दृष्टीकोन आपण बदलले आहेत.
या काही मनातील गोष्टी सांगण्यासाठी मी आपल्याला हा पत्र लिहलंय..🥺
तर गुरुजी,
मी, मोईन ह्युमिनिस्ट
देश - भारत (इंडिया)
शतक - 21 वे
तुमचा एक शिष्य.तुम्हाला निसर्गाच्या बाबतीत गुरूचा दर्जा दिलेला एक विद्यार्थी.
तुमच्या पुस्तकाचा एक वाचक.तुमच्या विचारांपासून प्रचंड प्रभावित झालेला आणि तुमच्या पुस्तक,व्यक्तिमत्त्व व विचारांचा कमालीचा चाहता.तुमच्या चरित्र आणि पुस्तकातून जीवन जगण्याचा एक नवीन मार्ग मला सापडला आहे.कळत/नकळतपणे खूप काही शिकलोय आणि शिकवलं आहे तुम्ही.व्यर्थ आणि फुटकळ गोष्टींचा विचार करून नैराश्यामध्ये गेलो होतो.सुरुवातीला गौतम बुद्ध आणि नंतर तुमचं वॉल्डन वाचून यातून बाहेर पडलो.आणि येथूनच तुमच्या विचारांच्या प्रचंड प्रेमात पडलोय.तुमच्या लिखाणाचा जणू वेड लागलाय,माझं आयुष्य थोरोमय झालं आहे.निसर्ग,पक्षी,प्राणी,कीटक,वृक्ष,नदी,सरोवर,भटकंती,लिखाण आणि पुस्तक वाचन इत्यादीवर आधी प्रेम होतंच.पण वॉल्डन वाचून अजून कितीतरी पटीने प्रेमात पडलोय.यांच्यावर असलेला प्रेम कितीतरी पटीने वाढला आहे. आपल्या आजूबाजूला बघण्याचा माझा दृष्टिकोन फार बदलून गेला आहे.निरीक्षणाची जाम आवड लागली आहे.
निसर्गातील लहानसहान गोष्टी आता माझस लक्ष वेधून घेत असते.विश्वाकडे बघण्याचा नजरिया फार वेगळा झाला आहे हे फक्त आपल्यामुळे.
या साठी आपल्याला लॉट्स ऑफ लव गुरू♥️
जेव्हा पासून मी वॉल्डन वाचून पूर्ण केलंय तेव्हापासून मी आपल्याला फॉलो करतो.गौतम बुद्धांच्या नंतर निसर्गाच्या आणि त्यांच्या विचारांच्या बाबतीत आपण मला फार भारावून टाकलं आहे.पर्यावरण,प्राणी,अहिंसा,भटकंती,साधी जीवनशैली आणि अफलातून विचारांच्या बाबतीत गौतम बुद्ध हे माझे पहिले गुरू तर आपण दुसरे ..गौतम बुद्धानंतर आपण मला खऱ्या अर्थाने निसर्ग आणि प्राण्यांवर प्रेम करायला शिकवले.माणसाला माणूस बघून बघायला शिकवले.मी खऱ्या अर्थाने मानवतावादी आणि अहिंसावादी बनलो ते फक्त आपल्या विचारांमुळे.
गुरुजी आपल्या पासून एवढं प्रभावित झालोय जे मी शब्दांत व्यक्त करू शकत नाही...मुंगी,मुंगळा,उंदीर,पशु पक्षी इत्यादीच बारीक निरीक्षण करण्याची आता सवय लागली आहे. फावल्या वेळेत हेच माझे सोबती असतात.खरोखर सांगतो माझ्या किराणा दुकानातील उंदीर सुद्धा ओळखीचा झाला आहे.जवळून गेलं तरी मी त्याला काही करत नाही म्हणून तो सुद्धा आता पायांवर उड्या मारत असतो.साखर मधील एक मुंगळा सुद्धा मरता कामा नये याची काळजी मी आता घेत असतो.दुकानातील किंवा घरातील मुंग्या मी मारू देत नाही.गल्लीतील कुत्रे, मांजरी, गाय, बकऱ्या यांना मी खूप प्रेम करतो.यांच्यासोबत एक आपुलकीची नाळ जुडली आहे.
निर्जीव वस्तू सोबत सुद्धा एक वेगळाच बॉण्ड जो आधीपासूनच जुडलेला होता तो पुन्हा घट्ट झाला आहे..पुस्तक वाचनाच्या सुरुवातीला आणि पुस्तक वाचना नंतर जेव्हा मी पुस्तकाचं चुंबन घेऊन हृदयाला लावतो,त्या पुस्तकाला पुन्हा भेटूया बोलतो तेव्हा कुटुंबातील किंवा मित्रांना विचित्र वेगळं वाटत असते. पण मला ते मनापासून आवडते आणि मी ते बिंदासपणे करत असतो.
शेवटी गुरूजी आपण माझ्या आयुष्यात कसे आलात याबद्दल दोन ओळी लिहून या पत्राचा समारोप करतो.♥️
तर गुरुजी पूर्वी मी आपला नाव आणि उल्लेख कोठेतरी वाचलेला होता.तेव्हापासून मला आपल्या बद्दल माहिती करून घ्यायची इच्छा होती.सुरुवातीला जेव्हा मला आपल्याबद्दल बद्दल माहिती हवी होती. तेव्हा इंटरनेट,गुगल बाबा वर विशेष अशी काहीही माहिती मराठीत उपलब्ध नव्हती..आमच्या मराठी भाषेतील उत्कृष्ट लेखिका दुर्गा भागवत मॅम यांनी अनुवाद केलेली आपली दोन्ही दुर्मिळ पुस्तके मिळत नव्हती.
(सर्वांत प्रथम मराठीत भाषिक वाचकांना आपला परिचय करून देणाऱ्या दुर्गा मॅमबद्दल मला फार आदर आहे.यांनी लिहलेलं सर्वकाही मला वाचायचं आहे.)
आणि मराठी भाषेत दुसरी आपल्या संबंधित पुस्तके बाजारात उपलब्ध नव्हती.आणि इंग्रजीचा माझा 36 आकडा होता.तरी इंग्रजी शिकत होतो पण इंग्रजी वाचून समजून घेण्यासाठी फार वेळ जाणार होता.आणि मला माझी उत्सुकता काही शांत बसू देत नव्हती.तर ते म्हणतात ना की पुस्तके तुमचा शोध घेत असतात ठीक याप्रमाणे अशातच एकेदिवशी अनिल अवचट सरांच एक पुस्तक हाती लागलं,
"शिकविले ज्यांनी " यामध्ये (थोरोचे विश्व) हा प्रकरण आपल्याबद्दल होता. त्या एका लेखाने मला आपल्याबद्दल निवडक पण महत्वपूर्ण माहिती मराठीत मिळाली.आणि येथून आपली शानदार एन्ट्री माझ्या आयुष्यात झाली.(आजपर्यंत हा लेख मी 8 वेळा वाचला असून वेळोवेळी चाळत असतो.)
यानंतर काही दिवसांनी मधूश्री प्रकाशन तर्फे आपलं वॉल्डन मराठीत आलं. अनुवाद जयंती कुलकर्णी सरांनी अप्रतिम पध्दतीने केलं होतं. वॉल्डन हाती लागताच मी ते वाचून संपवल आणि भारावून गेलो.वॉल्डन नंतर तर मी आपला डाय हार्ड चाहता झालो.येथून आपल्याबद्दल आणि आपल्या भन्नाट विचारांबद्दल अधिक वाचनाची मला जिज्ञासा निर्माण झाली.त्यामुळे मी येथून इतर काही पुस्तकांचा शोध घ्यायला सुरुवात केली. पण अपेक्षेप्रमाणे मला काहीच सापडलं नाही.एकेदिवशी अशातच वर्णमुद्रा प्रकाशनतर्फे आपलं प्रवासवर्णपर पुस्तक (केपकॉड) चं मराठी अनुवाद होऊन आल्याची बातमी मिळाली. तेव्हा मला जो आनंद झाला तो मी शब्दांत व्यक्त करू शकत नव्हतो..मग काय ? केपकॉड मागवलं आणि मिळता क्षणी एकाच बैठकीत वाचून पूर्ण केलं..भगवंत क्षीरसागर सरांनी ज्या सुंदरपध्दतीने या पुस्तकाचा अनुवाद केलं आहे त्याला खरंच तोड नाही..
तर अशाप्रकारे वॉल्डन नंतर केपकॉड हे आपले मी वाचलेले दुसरे पुस्तक होय. मी हे पुस्तक मिळाल्यानंतर सर्वकाही सोडून उत्स्फूर्तपणे अवघ्या ६ तासांतच वाचून पूर्ण केलेले हे पुस्तक माझ्या हृदयाच्या खूप जवळ आहे.एका जागेवर बसून सलग वाचन करणे कुठेही थोडं बोअर न होता, ही जादू आहे आपल्या लिखाणाची.आणि त्याला साजेसं केलेल्या उत्कृष्ट अनुवादाची..भगवंत सरांनी ज्यापद्धतीने अनुवाद केलं आहे त्याला खरंच हॅट्स ऑफ आहे..विशेष करून या पुस्तकात जी प्रस्तावना सरांनी लिहली त्यातून आपलं सारांशरुपानं चरित्र आणि आपल्या समग्र कार्याची ओळख मला झाली.
या नंतर जयंत सरांनी अनुवाद केलेलं हेन्री डेव्हीड थोरो -चरित्र व निबंध हे पुस्तक मराठीत आलं. या पुस्तकांने आपले नाव माझ्या काळजावर कोरले गेले. हे पुस्तक वाचून मला आजपर्यंत मिळाली नव्हती तेवढी माहिती आपल्याबद्दल मिळाली.आणि पुढे बहुचर्चित दुर्गा भागवत मॅमनी अनुवादित केलेलं आपलं दुर्मिळ पुस्तक वॉल्डनकाठी विचार विहार याची दुसरी आवृत्ती आली.आणि मी भरून पावलो.
आजपर्यंत दोन वेळा हे पुस्तक वाचून हृदयाशी लावून ठेवलं आहे.जमेल तसं पुन्हा पुन्हा चाळत असतो.आपल्या पुस्तकांनी खूप काही शिकवलं आहे.आयुष्य बदलण्याचं काम केलं आहे. मी आपल्याला कितपर्यत समजू शकलो,आपले विचार कितपर्यत आत्मसात करू शकलो हे मला Exactly सांगता येणार नाही.पण मी आता समाधानी आणि सुखी आहे.मला नैराश्य वगैरे आता येईल असे मला वाटतं नाही एवढं नक्की. कारण कुठलीही हाव, स्वार्थ आणि लालसा माझ्या मनात राहिलेली नाही एवढं नक्की..♥️
असो,
तर गुरुजी पत्रात लिहलेले लिहलेला प्रत्येक शब्द फार प्रामाणिक असून माझ्या मनातील भावना शुद्ध आहेत. बाकी काहीही चुकलं असेल तर या आपल्या शिष्याला आपण माफ करा.बाकी कधी या की स्वप्नात तुम्ही मला कंकॉर्ड फिरवा तर कधी मी आपल्याला भारत फिरवतो..😊
चला Bye,
पुढे नवीन प्रवास कळवतो.
लव यु सो मच गुरुजी
Thank You So much ♥️
आपलाच प्रामाणिक व मानवतावादी शिष्य
- Moin Humanist ✍️
अप्रतिम लेखन दादा👌
उत्तर द्याहटवाGood
उत्तर द्याहटवा