माझी मुंबई डायरी ♥️
1 मार्च पासून नवीन पद्धतीने अभ्यासाला सुरुवात करतोय.पुरस्कार मिळाल्यापासून आयुष्यात सर्वकाही चेंज झालं आहे. Harshal या माझ्या जिवलग मित्रांमुळे आता जास्तीत जास्त उच्चशिक्षण घेण्याची प्रेरणा मिळाली आहे.(Love U दोस्त) आपण सुद्धा देशभरातील उच्च विद्यापीठात जाऊन शिक्षण घेऊ शकतो असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे फक्त तुझ्यामुळे.जबाबदारी वाढली असल्याने आता कोठेही न थांबता योग्य त्या मार्गावर चालत राहायचं आहे एवढं नक्की केलं आहे.आजपर्यंत केलेल्या वाचनाने,अभ्यासाने समृद्ध झालोय खूप साऱ्या आयडियाज,कल्पना डोक्यात गिरक्या घालत आहेत.शिक्षणासोबतच काही तरी नवीन स्टार्टअप करायची इच्छा मनात आहे.त्या संबंधित मेहनत आणि अभ्यास सुरू आहे.आणि या अभ्यासाला,वाचनाला,मेहनतीला आजपासून गती देतोय.
यामूळे या सर्वांची सुरुवात करायची असल्याने माझ्या आयुष्यातील माझा आदर्श असलेल्या व्यक्तीमत्त्वाला अभिवादन करूनच ही एक नवीन सुरुवात करूया असं ठरवलं.
ज्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात माझी लाडकी पुस्तके आली व मला वाचनाची आवड निर्माण झाली,ज्यांच्यामुळे मी आज पदवीधर झालो आणि ज्यांच्यामुळे मी आता नवीन काहीतरी भन्नाट करायला घेतोय,जास्तीत जास्त उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रेरित झालोय,माझ्या आयुष्यातील पहिला वहिला पुरस्कार ज्यांना मी अर्पण केला होता त्या महामानवाला अभिवादन करण्यासाठी,काही प्रॉमिस करण्यासाठी चैत्यभूमीला भेट द्यायचं एका दिवसांचा सोलो ट्रिपचा प्लॅन मी बनवला.आणि 27 फेब्रुवारी रविवार रोजी चैत्यभूमीला भेट देण्यासाठी सज्ज झालो.
मग काय 26 फेब्रुवारी रोजी सर्वकाही बॅग पॅकींग वगैरे करून तयारी केली पुस्तकांसाठी जमवलेली व माझी काही वयक्तिक सेविंग काढली. यावेळी घरी काहीच मागितलं नाही.कारण ही ट्रिप मला स्वतःच्या खर्चाने करायची होती आणि ही माझी पहिली ट्रिप मी वडिलांकडून 1 रु सुद्धा न घेता पूर्ण केली.(याचा मला फार आनंद होतोय.) मी अलबर्ट एलिस, भीमराव रामजी आंबेडकर खंड 1 आणि डॉ.सलीम अली ही 3 पुस्तके प्रवासात वाचनासाठी घेतली तर काही छोटेखानी पुस्तके मित्रांना भेट म्हणून देण्यासाठी घेतली.यानंतर सर्वांना सोशल मीडियावर पोस्ट करून याबद्दल कळवलं.अनेकांनी भेटण्याची इच्छा दर्शवली अनेकांनी Ib त नंबर दिले तेव्हा फार भारी वाटलं आणि उत्सुकता खूप वाढली..
मग सर्वकाही ठरवून दुपारी निघालो बाबासाहेबांच्या भेटीला. स्वप्ननगरी मुंबईला.
सुलतानपूर ते औरंगाबाद आणि औरंगाबाद ते मुंबई (ट्रेनने) जायचं असा निर्णय घेतला.गावातून दुपारी एका प्रायव्हेट गाडीने औरंगाबाद रेल्वे स्टेशन वर रात्री पोहोचलो.आधी सोशल मीडियावर कळवल्याप्रमाणे काही मित्र विशेष करून रेल्वे स्टेशनवर भेटायला आले होते.यामध्ये सुरुवातीला Abhijeet Bangar दादा आणि Ajay Kasbe दादा या दोन भन्नाट व भारी माणसांची भेट झाली.(Huge Love दोघांना)
तर यानंतर Tiss च्या Exam साठी औरंगाबाद ला आलेले काही अफलातून आणि जबरदस्त माणसांसोबत अनपेक्षितपणे भेट झाली आणि खऱ्या अर्थाने ग्रेट भेट ठरली.यामध्ये Annasaheb Shete दादा, Vikas Thale दादा, Swapnil Sanap दादा, Anisha Agale ताई ही मंडळी होती..या सर्वांना बोलून,भेटून किती भारी वाटलं हे शब्दांत सांगू शकत नाही.या दोस्तांनो सोबत आणलेली एक-एक छोटेखानी पुस्तक भेट म्हणून दिली आणि लवकरच पुन्हा भेटूया हा आश्वासन घेऊन यांची रजा घेतली.(मनःपूर्वक शुभेच्छा सर्वांना )
यानंतर थोडा वेळ स्टेशनवर ट्रेनची वाट बघत उभा राहिलो.इथपर्यंत अनेक जणांचे कॉल्स सुरू होते पण वेळेअभावी खूप जणांना भेटता आलं नाही.(लवकरच भेटूया)
प्रथमच एकट्याने ट्रेनने प्रवास करत होतो त्यामुळे काही आयडिया नव्हती. थोडी भीती सुद्धा वाटतं होती.रेल्वेने आपला प्रवास कसा होईल ?याची काळजी वाटतं होती.(ट्रेन मध्ये चोरीचा प्रकार खूप घडत असतो हे ऐकलं वाचलं होतं त्यामुळे थोडी चिंता होतं होती)अशातच ट्रेन येऊन थांबली.काहीही आयडिया नसताना मी एका डब्ब्यात गेलो आणि तेथे एका जागेवर जाऊन बसलो..
TO Be Continued....♥️
©Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा