मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार ❤️

 
माझे चौथी पर्यतचे शिक्षण हे गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत झालेले आहे...या शाळेत मी खूप काही शिकलो मला अनेक अनुभव या शाळेतून मिळाले... एकंदरीत या शाळेने मला घडवले असे मी मानतो कारण या शाळेतुन मला जे अनुभव/शिक्षण/संस्कार मिळाले होते तर मला एखाद्या इंग्रजी कॉन्व्हेंट शाळेत अजिबात मिळाले नसते..या शाळेतून मला एक शिस्त लागली व अभ्यासाची आवड येथूनच निर्माण झाली/इतिहास व इतर काही विषयाची गोडी येथूनच लागली..मला जेव्हा पहिलीमध्ये शाळेत टाकलं होतं तेव्हा मी एक वर्ष शाळेत गेलोच नाही म्हणून मी माझ्या मित्रांपासून एक वर्ष मागे पडलो जेव्हा माझे मित्र दुसरीत गेले तेव्हा मी पहिलीत जात होतो...अशा प्रकारे माझं या शाळेतील प्रवास सुरु झाला व मी आता नियमितपणे शाळेत जाणे सुरू केले होते...पहिली व दुसरीत असताना घरची आर्थिक परिस्थिती ही खूप वाईट होती त्यामुळे घरी पोटभर जेवायला सुद्धा मिळत नसे त्यामुळे मी मधल्या सुट्टीत मिळणाऱ्या खिचडीच्या आशेने शाळेत जायचो..पहिलीच मला मला आठवत नाही पण दुसरीमध्ये माझा शाळेत दुसरा क्रमांक आला होता तेव्हा सरांनी पेढे मागितले होते तेव्हा वडिलांच्या जवळ पेढ्याला सुद्धा १० रु नव्हते तेव्हा त्यांनी एकाकडून उधार घेऊन पेढा घेऊन दिला होता..अशातच मी शाळेत जात होतो व अभ्यास करायचो आईवडील अशिक्षित असल्याने घरात अभ्यासाचा अजिबातच वातावरण नव्हतं मला अभ्यास कर असं कधीही कोणी म्हटलेलं मला आठवतं नाही..मी स्वतःच अभ्यास करायचो व आईवडिलांना दाखवायचो पण त्यांना यामधलं काहीच समजत नव्हते तरीही ते छान/शाबास म्हणायचे हे ऐकून मी जाम खुश व्हायचो आणि अभ्यासाला लागायचो...अभ्यासासोबतच मी नदीवर पोहायला जाणे,मित्रांच्या सोबत शेतात जाणे,इकडे तिकडे मोकाट फिरणे,वेगवेगळे जुगार खेळणे, अनेक प्रकारचे खेळ खेळणे इत्यादी गोष्टी सुद्धा करायचो कधी कधी तर शाळेतून पळून सुद्धा पोहायला व मित्रांच्यासोबत रानात  जायचो..

एकंदरीत असेच माझे आयुष्य सुरू होते आजकालच्या पालकांच्या सारख आयुष्यात मी व माझे पालक कधीही गंभीर नव्हतो व भविष्याच्या बद्दल कधीही आम्ही विचार केलं नव्हतं...मी शाळेत जायचो अभ्यास करायचो,अभ्यासात हुशार सुद्धा होतो पण मी पुढे शाळा शिकणार की नाही ?? अस लोकांना वाटायचं कारण मी शाळेत जाऊन सुद्धा खूप लोफर होतो व मोकाट धंदे जास्त करायचो त्यामुळे लोकांना माझं काहीच खरं दिसत नव्हतं....मी फक्त शाळेत जायचं म्हणून जात होतो माझं पुढचं काहीच नक्की नव्हतं की नेमके पुढे करायचे तरी काय ?? 

अशातच जिल्हा परिषद शाळेतील माझं चौथीपर्यंतच शिक्षण संपल आणि मी काही जणांच्या सांगण्यावरून गावातील  "श्री शिवाजी हायस्कुल या शाळेत सेमी-इंग्रजी माध्यमात प्रवेश घेतला..आता या शाळेत व आधीच्या शाळेत खूप फरक होता..येथे मुलं आणि मुली एकाच वर्गात बसायचे,बसायला डेस्क बेंच असायचे,वर्गातील विध्यार्थ्यांची संख्या खूप जास्त असायची,गावातील व इतर खेड्यातील विद्यार्थी सुद्धा या शाळेत व इंग्रजी शाळेतील मुलं सुद्धा याचं शाळेत असायचे व मुख्य बाब म्हणजे सेमी इंग्रजी माध्यमात इंग्रजी,विज्ञान व गणित हे विषय इंग्रजीत होते आणि माझा संबंध इंग्रजी सोबत अजिबात संबंध नव्हता होता तो फक्त इंग्रजी या एका पुस्तकासोबत आणि त्याची कमी मी कॉपी करून भरून काढली होती....या शाळेत मी प्रवेश घेतला आणि येथून मी मागे पडायला लागलो इंग्रजी शाळेतील फडाफड इंग्रजी बोलणाऱ्या मुलांच्यामुळे मला न्यूनगंड निर्माण झाला,विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे येत असून सुद्धा मी देत नसे,शाळेत व अभ्यासात मन लागत नव्हतं यामुळे मी शाळेत जाणेच खूप कमी केले..वडिलांच्या धाकाने कधी गेलो तर दुपारच्या सुट्टीत पळून परत येत होतो,शाळेच नाव घेणं मला आवडत नव्हतं व मी शाळा बदलायच्या विचारात होतो पण काही जमलं नाही..मी फक्त जुगार खेळायचो,नदीवर जायचो,शेतात जायचो आणि माचिस च्या डब्ब्या शोधत गावभर हिंडायचो..आईवडिलांच लक्ष माझ्याकडे अजिबात नव्हतं आणि याच मी पुरेपूर फायदा उचलत होतो...

बघता बघता २ वर्ष निघून गेले आणि मी आता ७ वीत कसाबसा धक्कल पास होऊन आलो होतो..५-६ वीत मी कमीतकमी ६-७ महिने जेमतेम शाळेत गेलो असेल आणि अभ्यासाबद्दल तर विचारूच नका...७ वी ची शाळा सुरू झाली आणि आता वडिलांनी विशेष लक्ष देऊन मला शाळेत पाठवायला सुरुवात झाली २-४ वेळा तर मला कुत्र्यासारखं झोडपून काढलं...म्हणूनच मी आता नियमितपणे शाळेत जायला सुरुवात केली पण माझं फक्त शरीर शाळेत जायचं मन मात्र नदीवर !! यामुळे मला शाळेत काय चाललंय हे काहीच कळायचं नाही,पुस्तकाचं आणि माझा संबंध तर अजिबात नव्हताच,घटक चाचण्या वगैरे माझ्यासाठी अंधश्रद्धा होत्या,कोणत्या विषयाला कोणते सर आहेत हे मला त्या सरांचा मार खाल्ल्यावर कळायचं,शाळेतुन आल्यावर दप्तर फेकायचं आणि खेळायला जायचं हा माझा आता दिनक्रम बनला होता...

एकेदिवशी शाळेत गेल्यावर कळालं की आज गणिताचे शिक्षक शाळा उघडल्यापासून ते आजपर्यंतच्या सर्व गृहपाठाच्या वह्या तपासणार आहेत मी जाम घाबरलो कारण गृहपाठ हे काय असते हेच मला माहिती नव्हतं.. सरांनी वह्या तपासल्या आणि ज्यांच्या पूर्ण नव्हत्या त्यांना २-२ छड्या मारायला व अपमान करायला सुरुवात केली ..माझा नंबर येताच सरांनी मला २ छड्या मारल्या आणि माझा अपमान केला मला तो त्या क्षणी सहन झाला नाही आणि मी सरांना उद्धटपणे उलट बोललो..त्या सरांनी मला शिक्षा न करता हेडमास्तरांच्या समोर नेऊन उभे केले मी हेडमास्तरांच्या समोर सुद्धा Attitude मध्ये खिश्यात उभा घालून उभा होतो..हेडमास्तरांनी मला काहीही न बोलता वडिलांना बोलावून आणायचे सांगितले म्हणून मी लगेच गेलो आणि वडिलांना बोलावून आणले..वडिलांना त्यांनी सर्व हकीकत सांगितली आणि मला शाळेतून न काढता समजावून सांगितले... मी वडिलांच्या सोबत घरी आलो वडिलांनी सुद्धा मला न बोलता/मारता फक्त प्रेमाने समजावले..

या घटनेनंतर आता मला शाळेत जायला लाज व भीती वाटायला सुरुवात झाली होती आणि यामुळे मी पुन्हा शाळेत जायला नाटकं करायला सुरुवात केली व शाळेकडे पाठ फिरवली..असेच उद्या उद्या करत करत दिवाळी आली आणि प्रथम सत्राच्या परिक्षेला सुरुवात झाली मी सरळ सरळ परीक्षेला गेलो आता परीक्षेत मी काय दिवे लावले असतील  ??हे तुम्ही ठरवूच शकता...परीक्षा संपली व दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आणि याच दिवाळीच्या सुट्ट्या माझ्या आयुष्यात खूप महत्वाच्या ठरल्या ज्याने माझे आयुष्य एकंदरीत बदलून टाकले..

दिवाळी संपली पण सुट्ट्या अजूनही बाकी होत्या एकेदिवशी दुपारी मी घरीच होतो व टीव्ही बघत होतो..टिव्हीवर वर चॅनल बदलता बदलताच दूरदर्शन हा चॅनल लागलं त्या चॅनेल वर एक चित्रपट सुरू होत होता त्या चित्रपटाच नाव होतं "डॉ बाबासाहेब आंबेडकर" !!सुरुवातीच्या शूद्र/दलितांची चित्रफिती माहिती बघून मला रोचक वाटल आणि मी तो चित्रपट बघायला सुरुवात केली (मला आधी अजिबात माहिती नव्हत की हा चित्रपट बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटाच नाव डॉ बाबासाहेब आंबेडकर आहे) मी हा चित्रपट बघता बघता यामध्ये एकंदरीत एवढा हरवून गेलो की मला माझच भान राहील नव्हतं...मी बाबासाहेबांच्या बाबतीत फक्त ऐकलं होतं की ते खूप मोठे माणूस/नेते होते ,त्यांनी दलितांसाठी खूप मोठे कार्य केले होते,इत्यादी इत्यादी..ज्या माणसाचे आजपर्यंत पुळतेच बघितले होते,ज्यांच्याबद्दल फक्त याच्या त्याच्याकडून ऐकलं होतं किंवा शाळेतील काही धड्यात वाचलं होतं त्या माणसाचे जीवनकार्य आपण टीव्हीवर बघतोय आणि एवढ्या उशिरा बघतोय याचाच मला अप्रूप व दुःख वाटत होतं...डॉ.बाबासाहेबांचे शिक्षणावर/पुस्तकावर प्रेम पाहुन, त्यांचे कठीण समाजसोबत संघर्ष पाहुन ,मी एकदम अचंबित झालो ,भारावून गेलो,काही वेळा अक्षरशःरडलो सुद्धा .. अचानकच एक नवीनच प्रेरणा मला मिळाली,आयुष्याला एक कलाटणी मिळाली,दिशा मिळाली आणि तेव्हा पासूनच मी बाबासाहेब आंबेडकरांना माझ्या जीवनातील आदर्श मानले...

त्यादिवसापासुन मला डॉ.बाबासाहेबांच्या बद्दल जाणुन घेण्याचे वेड लागले त्यासाठी मी आजूबाजूच्या अनेक ग्रंथालयात जावुन बाबासाहेंबाबद्दल लिहलेली काही छोटीमोठी अनेक पुस्तके वाचुन काढली ( आणि येथूनच मला वाचनाची गोडी लागली व मी वेगवेगळी पुस्तके जमवायला सुरुवात केली ) त्या चित्रपटाची डीव्हीडी आणून अनेक वेळा तो चित्रपट पुन्हा बघितला ... अनेक पुस्तके वाचुन प्रेरणेने पेटुन उठलो व आयुष्यात प्रथमच गंभीर होऊन एक महत्त्वाचा निर्णय घेतला की " मी आता आज पासून कधीही कोणत्याही प्रकारचा जुगार खेळणार नाही,कधीही शाळा बुडवणार नाही,नियमितपणे रोज शाळेत जाऊन जोमाने अभ्यास करायच आणि चांगले शिक्षण घेऊन बाबासाहेबांच्या सारखे समाजासाठी/देशासाठी काही तरी करायचे आहे हा निर्णय घेतला..सुट्ट्या संपल्या आणि शाळा पुन्हा सुरू झाल्या आणि आता मी नियमितपणे शाळेत जायला सुरुवात केली व अभ्यासाला सुद्धा..मी माझ्या आजूबाजूला २-३ तील लहान मुलामुलींच निरीक्षण केले त्यांना अभ्यास करताना बघून मला पुन्हा प्रेरणा मिळाली आणि अशाप्रकारेच मी ७ वी पास होऊन ८ वीत गेलो..८ वीत सुद्धा मी नियमितपणे शाळेत जाऊन अभ्यास सुरू ठेवला,सरांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यायला सुरुवात केली,वर्गाचा मॉनिटर स्वतःच्या इच्छेने झालो आणि अभ्यासाला गती दिली...या काळातच मी माझं इतर वाचन वाढवलं अनेक वेगवेगळ्या पुस्तके/कादंबऱ्या वाचायला सुरुवात केली.. मी अनेक महापुरुषांच्या बाबतीत वाचलं उदा:-छत्रपती शिवराय, शाहूमहाराज, शंभुराजे, ज्योतिबा, बाबासाहेबाबद्दल तर सुरू होतेच आणि इतर महापुरुषांच्या बद्दल वाचून समृद्ध झालो..हा वर्ष कधी गेला कळलंच नाही आणि मी ८ वी पास होऊन ९ वीत गेलो...

८ विच्या परीक्षा समाप्त होऊन उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या या उन्हाळ्यात मी खूप वाचन केलं आणि अनेक नवीन पुस्तके खरेदी करून संग्रही करायला सुरुवात केली..सुट्ट्या संपून शाळा सुरू झाल्या आणि मी पहिल्याच दिवशी शाळेत गेलो आणि अभ्यासाला सुरुवात सुद्धा केली..पण शाळा उघडून १-२ महिने झाले आणि येथूनच माझी गाडी पुन्हा पटरीवरून खाली उतरली आणि अभ्यासातून माझा मन भटकायला सुरुवात झाली...मी पुन्हा शाळा बुडवायला सुरुवात केली,अभ्यास बाजूला ठेऊन मी एका वेगळ्याच दिशेला जात होतो.. ती दिशा होती " प्रेमाची म्हणा किंवा आकर्षणाची "याकाळात मी अनेक मुलींच्या प्रेमात पडलो आणि अनेक नको ते उद्योग मी या वयात करू लागलो...आयुष्यात कधीही स्वतःच्या कपड्यावर, राहणीमानावर विचार न करणारा मी आता पद्धतशीरपणे राहू लागलो होतो,एकाच वेळी ३-४ प्रेम प्रकरण करू लागलो ,आयुष्यात कधी १०-२० रुपयाच्या वरी चॉकलेट न खाणारा मी १०० -२०० रुपयांचा चॉकलेट मी तिला घेऊन देत होतो,वडिलांच्या कडून खोटे बोलून पैसे घेऊन तिला भेट देऊ लागलो इत्यादी...मग जसे इतरांच्या सोबत होतो" लव सेक्स आणि धोका तसा माझ्या सोबत सुद्धा झाला.. हा वर्ष असाच गेला या वर्षात मी कमीत कमी १३ प्रेम प्रकरण केले आणि वर्षाअखेर सर्व समाप्त सुद्धा मीच केले...आजकालच्या सारख ब्रेकअप करणे मग रडणे असल्या पांचट गोष्टी मी कधीही केल्या नाही फक्त सेक्स पुरतेचं प्रेम कोणत्याही मुलींवर केलं नाही एवढं मात्र १००% ..पण शेवटी जेव्हा पुन्हा एकदा डोळे उघडले तेव्हा आपण एक वर्ष वाया घालवला याचं मला खूप दुःख झालं आणि येथून मी प्रेमाच्या जाळ्यातून बाहेर पडलो आणि फक्त १ महिना अभ्यास करून ९ वीची परीक्षा दिली आणि कसाबसा पास झालो.....

९ वी संपली आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या आणि मी पुन्हा वाचन सुरू केले पुन्हा काही नवीन पुस्तके खरेदी केली..आणि याच काळात मी भविष्याबद्दल विचार करून आयुष्यात प्रथमच नक्की केलं की मला भविष्यात UPSC परीक्षेची तयारी करून IAS/ IPS ऑफिसर बनायचं आहे व देशाची/समाजाची सेवा करायची आहे..कारण सिव्हिल सर्व्हिसच एक असा प्लेटफ्रॉम आहे ज्याच्या माध्यमातून आपण जनतेच्या मधोमध जाऊन त्यांच्याशी संवाद साधून/त्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू शकतो इत्यादी " हा निर्णय मी माझ्या पालकांना सांगितला ते खूप आनंदी झाले व त्यांनी  " तुला जे करायचे ते कर तुझ्यावर आमचा कुठलाही दबाव नाही किंवा आमची कोणतीही तक्रार नाही "आम्हाला तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू जे करशील ते उत्तमच करशील आमच्या शुभेच्छा आणि आशिर्वाद नेहमी तुझ्या सोबत आहे  "असे सांगून मला पूर्ण करिअर निवडण्याची फ्रीडम/मोकळीक/आजादी दिली  जी आजकाल खूपच कमी पालक आपल्या मुलांना देताना दिसतात..त्यांनी माझ्यावर कधीही कुठलाही दडपण टाकला नाही किंवा त्यांच्या इच्छा आकांक्षा माझ्यावर थोपवल्या नाहीत जे आजकालचे पालक आपल्याला करताना दिसतात...

उन्हाळ्याच्या सुट्टीत UPSC ठरवल्या प्रमाणे आता लवकरात लवकर शिक्षण पूर्ण करून चांगला अभ्यास करून दिल्ली गाठायची आहे असा निर्णय घेतला आणि १० वीच्या अभ्यासाला सुरुवात केली...शाळा सुरू झाल्या आणि अशातच आमचं सुल्तानपूर येथून मेहकर येथे स्थलांतर झालं यामध्येच माझे काही महिने माझे वाया गेले..गणित या विषयात मला जराही रुची नव्हती आणि नाही त्यामुळे मला शंका होती की मी या विषयात मी पास होईल की नाही मी या विषयाचा अभ्यास करायचा प्रयत्न केला पण काहीही फरक पडला नाही..काही जणांनी शिकवणी लावायचा सल्ला दिला पण मला शिकवणी वगैरे आवडत नव्हती...१० वीत मी एकंदरीत खूप खूप कमी अभ्यास केला पण मला पास व्हायची तर हमी नक्क्कीच होती तीसुद्धा विनाकॉपी..आमच्या इकडच्या शाळेत/कॉलेजमध्ये जोरात कॉप्या चालत असतात चक्क शिक्षक कॉप्या वाटतात यातच सर्व काही आलं...पण मी नक्की केलं होतं की काहीही झालं तरी आपण कॉपी मात्र करायची नाही म्हणजे नाहीच कारण आम्हाला कॉपी मुक्त परीक्षेची शपथ देण्यात आली होती आणि ज्या सरांनी ती शपथ दिली होती ती त्यांनी स्वतःच तोडली होती मग विद्यार्थी ती शपथ तोडणारच नाही तर काय ??पण मी आईशपथ ती शपथ मात्र तोडली नाही...शेवटी पेपर झाले मी गणितात जे आलं ते लिहून मोकळा झालो होतो...माझा प्रत्येक पेपर चांगला गेला होता फक्त माझ्या लिखाणाच्या स्लो गतीमुळे मला जे येत होत ते सुद्धा लिहायचं वेळ मिळाला नाही याचं मला दुःख होत होतं..पेपर झाले आणि आता आम्ही निकालाची वाट बघत होतो..मी इकडे सर्व Tension बाजूला ठेऊन माझ्या इतर वाचनाला सुरुवात केली होती या काळात मी अण्णा भाऊ साठे यांची फकिरा ही कादंबरी वाचली होती..२ महिन्यानंतर निकाल लागला आणि मी पास झालो होतो टक्के होते ५७% मला अपेक्षा ४५-५०% टक्क्यांची होती पण तरीही काही जास्त पडले होते..गणितात अपेक्षेप्रमाणे काठावर पास झालो आणि मी डायरेक्ट गल्लीत चॉकलेट वाटले..इकडे माझ्या मित्राला ८२% होते तरीही तो दुःखी होता याचं मला थोडं नवल वाटले....निकाल घरी सांगितला पालक खुश झाले त्यांना टक्क्यांशी काहीही घेनदेन नव्हतं आपला मुलगा पास झाला याचाच त्यांना खूप आनंद होत होता..आणि आजकालचे आईवडील बघा..कमी टक्के पडले तर खाऊन टाकायचा बाकी ठेवतात जसे जास्त टक्के म्हणजे आयुष्यच आहे...

निकाल लागला आणि कॉलेजमध्ये प्रवेश घेण्याची गर्दी सुरू झाली..आता प्रवेश कोणत्या माध्यमात घ्यावा विज्ञान अथवा कला...माझी इच्छा आर्ट मध्ये होती कारण इतिहास व राज्यव्यवस्था हे विषय माझे आवडीचे होते आणि ५७ टक्क्यांवर मला विज्ञान मध्ये प्रवेश मिळेल याची मला खात्री नव्हती..पण तरीही काही मित्रांच्या सांगण्यावरून मी चुतीयापंती करत विज्ञान शाखेत मध्ये प्रवेश घ्यायला फॉर्म भरला पण विज्ञान शाखेत प्रवेशासाठी ६०%हवे होते म्हणून माझा प्रवेश कॉम्प्युटर सायन्स या शाखेत झाला...आता कॉलेज सुरू झाला आणि सर्व डोक्यावरून जायला सुरुवात झाली..रसायनशास्त्र,भौतिकशास्त्र आणि गणित हे तीन विषय माझ्या डोक्यावरून जात होते पण तरीही इलाज काही नव्हता..या कॉलेजमध्ये मी प्रत्येक भाषणात भाग घेतलं, भाषण दिले जे मी शाळेत करू शकलो नव्हतो ते मी या कॉलेजमध्ये केलं..एक वर्ष कसाबसा काढला आणि अकरावी पास होऊन गावातील त्या कॉलेजमधून प्रवेश काढून घेतला आणि बारावीसाठी मित्रांच्या सांगण्यावरून मालेगाव तालुक्यातील एका कॉलेजमध्ये विज्ञान शाखेत प्रवेश घेतला...या कॉलेजमध्ये फक्त परीक्षेसाठी जायचं होतं बाकी ते सांभाळणार होते आणि परीक्षेत कॉप्या सुद्धा पुरवणार होते फक्त आपण पैसा मोजायचा...१२ वीत प्रवेश घेतला आणि इकडे मी Upsc बद्दल माहिती घ्यायला सुरुवात केली अनेक मोफत सेमिनार बघितले, अनेक पुस्तके वाचली काही नवीन घेतली,अनेक अधिकाऱ्यांची भाषणे ऐकली,खूप ठिकाणी फिरलो प्रथमच पुणे व मुंबई येथे गेलो अनेक क्लासेस बघितले व त्यांची विचारपूस केली...आणि अशातच माझ्या बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या.. 

आमचा सेंटर मालेगाव तालुक्यातील एक छोट्याशा गावातील एका शाळेत होता म्हणून मी आणि माझा मित्र रोज ४५ किलोमीटर हा प्रवास बाईक वर करत होतो आणि एक्साम सेंटर वर पोहोचत होतो...या सेंटर वर फक्त आणि फक्त कॉपीच वर्चस्व होत..विद्यार्थी समोर गाईड/डायमंड ठेऊन पेपर लिहत होते जसं हे १२ वीचे बोर्डाचे पेपर नसून मजाक सुरू होता..मला हे बघून राग आणि हसू एकसाथ येत होतं कारण शिक्षकांपासून ते चपराशी पर्यत सर्व कॉप्या वाटत होते..मी बारावीचा इंग्रजी,मराठी फक्त या दोन विषयाचा अभ्यास केला होता कारण बाकीच्या विषयात माझा स्वारस्यच नव्हता यामुळे मी या पेपरात कॉपी केली आणि मी पैसे सुद्धा यासाठीच दिले होते म्हणा १२ वीत मी नितीमत्तेला फाट्यावर मारलं होत कारण १० वीत विठाऊट कॉपी पास होऊन सुद्धा लोकांना ते पटत नव्हते किंवा मी कॉपी केली नाही हे त्यांना खोटं वाटत होते म्हणून मी आयुष्यात प्रथमच कॉपी केली पण फक्त लिमिटेड कारण येथे सुद्धा लिखाणाच्या गतीने मला धोका दिला आणि मी अनेक प्रश्नांची उत्तरे लिहू शकलो नाही...परीक्षा संपल्या आणि मी रिलॅक्स झालो मला येणाऱ्या निकालाची जराही चिंता नव्हती मी पास होईन याची मला खात्री होती कारण टक्क्यांना मी आजपर्यंत फाट्यावर मारलंच होते..२-३ महिन्यानंतर निकाल लागला आणि अपेक्षेप्रमाणे मी पास झालो आणि यावेळेस मला टक्के होते ५५% म्हणजे दहावी पेक्षा दोन % कमी (कॉपी करून सुद्धा) ..दहावी प्रमाणेच मी आणि माझे पालक सुद्धा आनंदी झाले पण या वेळी मी पेढे/चॉकलेट काहीच वाटले नाही कारण आता या गोष्टी माझ्यासाठी क्षुल्लक होत्या मी आणि इतर जण कशाप्रकारे पास झाले होते हे मला माहिती होते त्यामुळे मला प्रत्येक गोष्टीच हसू येत होते...९ वी पासून मी खूप साऱ्या पुस्तकाचं वाचन केल्यामुळे माझा समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदललेला होता..मला आता Upsc साठी पुणे येथे कोचिंग करायचं होतं पण काही कारणामुळे मी अर्धेपैसे भरून सुद्धा गेलो नाही याबद्दल मी विस्तृत लिहलं आहे येथे वाचा :-https://m.facebook.com/story/graphql_permalink/?graphql_id=UzpfSTEwMDAxOTgxMTk3MTI2ODo0OTU2NjM5NTExMDQwMDA%3D

आता मी दहावी-बारावी/कमी टक्के वगैरे सर्व विसरून फक्त आणि फक्त Upsc वर फोकस करायला सुरुवात केली..इंजिनिअरिंग,Bsc, B.com वगैरे माध्यमात मला जरासा सुद्धा स्वारस्य नव्हता आणि बारावीतल्या ५५% मुळे मला कोणत्याही चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार नव्हता हे मी जाणून होतो त्यामुळे मी मुक्त विद्यापीठामध्ये इतिहास विषयात बी.ए करायचं नक्क्की केलं आणि प्रथम वर्षाला प्रवेश घेऊन घरीच राहून बी.ए व Upsc च्या बेसिक अभ्यासाला सुरुवात केली..मी घराजवळच एक कॅबिन बनवली व त्यामध्ये स्वतःच एक अभ्यासाचा वातावरण तयार केलं..या कॅबिनला मी स्टडी बंकर असे मी नाव दिले या बंकर मध्ये मी आपल्या सर्व महापुरुषांचे फोटोस ,Upsc चा अभ्यासक्रम, भारत व जगाचे नकाशे लावले , नवीन संगणक व प्रिंटर आणि नवीन पुस्तकाची रॅक व त्यामध्ये भरपूर पुस्तके फिट केली नवीन Wifi connection घेतला आणि  एक भन्नाट खोली मी तयार केली आणि यामध्ये मी मला लागणार सर्व साहित्य जमा केलं.. प्रथम वर्षात मी वर्षभर खूप खूप अभ्यास केला,upsc ला लागणारी NcERt व संदर्भ पुस्तके व स्टडी आयक्यु चा ३ वर्षाचा कोर्स  खरेदी केली/केला आणि अनेक पुस्तके/कादंबऱ्या वाचली व Upsc बद्दल A To Z माहिती मी प्राप्त केली...बघता बघता प्रथम वर्ष मी पास झालो आणि द्वितीय वर्षात प्रवेश घेतला..

आता द्वितीय वर्षात मी प्रवेश घेतला आणि अभ्यासाला सुरुवात केली पण प्रथम वर्षात सर्व विसरून एकाच जागेवर अभ्यास केल्याचा त्रास मला द्वितीय वर्षात व्हायला सुरुवात झाली..माझी तब्येत अचानकच ढासळली व मला फिशर हा आजार झाला यामध्येच ६ महिने कोठे गेले व कसे गेले मला कळालेच नाही..येथें वाचा :-http://vaicharikbharat.blogspot.com/2020/06/blog-post_19.html
तब्येत व्यवस्थित ठीक झाली आणि मी पुन्हा जोमाने अभ्यासाला सुरुवात केली पण काही दिवस लोटताच मी अचानकच Dipression मध्ये जायला लागलो आधी मला समजलच नाही अचानकच कशातच मन रमेना,अभ्यासात मन लागत नव्हतं फक्त आणि फक्त बोअर वाटत होतं..मी बाहेर फिरणे/मित्रांशी बोलणे एकंदरीतच बंद केले होते याबद्दल मी विस्तृत लिहलं आहे (येथे वाचा :- 
http://vaicharikbharat.blogspot.com/2020/06/my-experience-about-dipression.html )

Dipression मधून मी बाहेर आलो आणि हा कोरोना सारखा व्हायरस आला आणि देश Lokdown करण्यात आलं त्यामुळे माझे द्वितीय वर्षाचे एक्साम रद्द झाले आणि सध्या मी एक्सामचीच वाट पाहत आहे.त्यामुळे सध्या upsc ला बाजू ठेऊन फक्त आणि फक्त इतर वाचन सुरू आहे..
आता १ ऑगस्ट पासून Upsc च्या मुख्य अभ्यासाला सुरुवात करतोय २०१९ हा वर्ष माझ्यासाठी व २०२० हा आपल्या सर्वांच्यासाठी खूप कठीण होते आणि आहे..२०२२ या वर्षी मी माझा Upsc चा प्रथम Attempt देईल तब्येत ढासळली नसती व माझा १.५ वर्ष वाया गेला नसता तर हा Attempt मी २०२१ मध्येच दिला असता...पण पुरेपूर अभ्यास करूनच मी First Attempt देईल आणि First ला लास्ट Attempt बनवल्याशिवाय राहणार नाही एवढं मात्र नक्की..फक्त पाठीशी तुम्हा सर्वांच्या शुभेच्छा कायम असू द्या..

😊थोडं मनातलं......

मी व माझ्या आईवडिलांनी कधीही
 आयुष्यात कधीही गुणांना महत्व दिले नाही...मी आयुष्यात Upsc त सफल होवो अथवा न होवो पण एक गोष्ट नक्कीच आहे की मी आयुष्यात जे काही करेल ते बाकी उत्कृष्टच करणार हे १००% ..माझ्या आयुष्यात कधीही कमी टक्क्यांमुळे मला कुठलाही  प्रॉब्लेम झाला नाही व होणार सुद्धा नाही अथवा मी यामुळे माझ्या यशात कुठलीही अडचण येऊ देणार नाही एवढं मात्र नक्की...मी नेहमी शिकण्यावर/समजून घेण्यावर भर दिलं फक्त रट्टा मारून पाठांतर मी कधीच केले नाही आणि करत नाही...यामुळेचा मला आज माझ्या भविष्याची कुठलीही चिंता नाही जे सुद्धा करीन ते शानदार जबरदस्त जिंदाबादच....😊

©Moin Humanist✍️

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼