We Read या उपक्रमाचा उद्देश्य...💜
वाचन हा माझा आवडता छंद आहे.या छंदासाठी मी कितीही व्यवस्त असलो तरीही वेळ काढतोच.मी पुस्तक वाचतो आणि माझं अनुभव इतरांच्या सोबत नेहमी शेअर करत असतो.वाचलेल्या पुस्तकाबद्दल इतरांना माहिती व्हावी,इतरांना पुस्तक वाचनाची आवड लागावी हा त्या मागचा मुख्य उद्देश्य असतो.त्यामुळे पुस्तक वाचल्यानंतर त्या पुस्तकांबद्दल माझा अनुभव थोडक्यात जरूर लिहीत असतोच...
मी जेव्हा पुस्तकाबद्दल लिहितो तेव्हा मला अनेक जणांचे Msg येत असतात. त्यामध्ये हे पुस्तक कोठे मिळेल ?? एवढी पुस्तके कशी खरेदी करतो ??विद्यार्थी असताना पुस्तक खरेदी साठी एवढे पैसे कोठून येतात ??या पुस्तकाचं Pdf मिळेल का ?? इत्यादी इत्यादी प्रश्नांचे उत्तर मी जमेल तसे देत असतो.याबद्दल मी विस्तीर्ण लिहिलं सुद्धा आहे..या आणि अशा इतर प्रश्नाने अशातच मागच्या वर्षी इतरांना एकदम सवलतीत घरपोच पुस्तके मिळावी,दर्जेदार पुस्तकांच्याबद्दल माहिती व्हावी यासाठी माझ्या मनात एक कल्पना आली आणि मी ती प्रत्यक्षात उतरवली.ती कल्पना अशी होती की आपण वेगवेगळ्या प्रकाशनाची दर्जेदार पुस्तके पुस्तक विक्रेत्याच्या नावाने मोठ्या प्रमाणात खरेदी करायची.आणि प्रकाशनाकडून मिळणारी सवलत पॅकिंग,पोस्टेज चा खर्च वगळता सरळ सरळ द्यायची..आठवड्यातील दर शनिवारी इतरांचा व्हाट्सअप्प नंबर घेऊन त्यावर उपलब्ध असलेल्या पुस्तकांची यादी पाठवायची..वाचकाला हवी असलेले पुस्तक वाचकाने निवडायची आणि मला कळवायची. दुसऱ्या दिवशी वाचकाला ते पुस्तक एकदम व्यवस्थित पॅकिंग करून भारतीय पोस्टाने पाठवायची.वाचकाने त्याला जमेल तसं त्या पुस्तकाची सांगितलेली किंमत कोणत्याही Upi id ने पाठवून द्यायचं...
मग मी अभ्यासातून वेळ काढून एक योजना बनवली आणि यातूनच सुरुवात झाली एका आगळ्या वेगळ्या उपक्रमाला ज्याचं नाव होतं "खजिना_पुस्तकांचा" एकूण ४ महिने मी हा उपक्रम चालवला.असंख्य वाचन प्रेमींचा याला भरघोस प्रतिसाद मिळाला..४ महिन्यांतच आम्ही २ लाख १० हजार रुपयांची पुस्तके एकदम सवलतीत वाचकांच्या पर्यत पोहोचवली.अभ्यासाचा लोड वाढल्यामुळे व एक छोटासा ब्रेक म्हणून मी हा उपक्रम काही कालावधीसाठी बंद केला होता.पण उपक्रम बंद करून ५-६ महिन्यानंतर सुद्धा रोज अनेक वाचकांचे Msg सुरूच होते.अनेक जणांनी उपक्रम सुरू करण्यासाठी आग्रह केला आणि काही दिवसांपूर्वी हा उपक्रम आपण नव्याने We_Read नावाने पुन्हा सुरू केला आहे...
टीप:- हा उपक्रम फक्त आणि फक्त पुस्तक प्रेमींसाठी आहे त्यामुळे फक्त वाचनाची आवड असणाऱ्या मित्रांनीच जुडावे..💜
खूपच सुंदर कल्पना आहे आणि आमच्या सारख्या नवीन वाचकांसाठी तुमचे विचार तसेच दर्जेदार लेखक,आणि पुस्तकांची माहिती मिळून नक्कीच आमच्या संग्रहात भर पडेल
उत्तर द्याहटवा