We Read या उपक्रमाचे नियम.....💜



वाचनाची आवड असलेल्या पुस्तक प्रेमींना जास्तीत जास्त पुस्तके संग्रही करून वाचता यावी...यासाठी भरघोस सवलतीत कमीत कमी किंमतीत नवी कोरी दर्जेदार पुस्तके वाचन प्रेमींना घरपोच पोहोचवता यावी यासाठी हा निस्वार्थी उपक्रम राबवल्या जात आहे..

अगदी सोप्या भाषेत उपक्रमाचे काही निवडक नियम...🙂

१)दर शनिवारी दुपारी १२ वाजता उपलब्ध असलेल्या नवीन दर्जेदार पुस्तकांची यादी We Read या व्हाट्सअप्प ग्रुप, फेसबुक पेज,टेलिग्राम चॅनेल इत्यादी प्लॅटफॉर्म वर जाहीर केली जाईल..

पुस्तक यादीचा फॉरमॅट खालीलप्रमाणे असेल...

१)पुस्तकाचे नाव
२)लेखक
३)पुस्तकाची मुळ किंमत
४) उपक्रमात असलेली किंमत पाठवण्याचा खर्च यामध्ये ऍड केलेला असेल.
५)यादीतील प्रत्येक पुस्तकाबद्दल छोटसं वर्णन जेणेकरून वाचकाला ते पुस्तक कशाबद्दल आहे हे माहिती होईल...

इतर काही पुस्तकांच्या काही प्रति उपलब्ध असतील तर ते इतर दिवशी सुद्धा तुम्हाला कळल्या जातील...पुस्तकांची यादी ही मर्यादित असल्याने मोजक्या प्रतीचं शामिल होत असतात...
तुम्ही तुम्हांला हव्या असलेल्या पुस्तकांच्या बद्दल सुद्धा माहिती देऊ शकता ते पुस्तक तुम्हांला मिळवून देण्याचा १००% प्रयत्न राहणार...

२)तुम्ही दिलेल्या पुस्तकातून तुमच्या आवडीची व तुम्हाला हवी असलेली पुस्तके निवडायची आणि मला कळवायचं..

३)पुस्तक कळवल्यावर तुम्ही तुमचं ऑर्डर १००% confirm करायचं.आणि सांगितलेल्या नंबरवर Google, Phone Pay किंवा Paytm करून त्याचा Screenshot काढून मला पाठवायचं..

४)जर तुमचा ऑर्डर confirm नसेल तर तुम्ही तसे लगेच नमूद करावे काहीही प्रॉब्लेम होणार नाही.

५)पेमेंट केल्यानंतर तुम्ही तुमचा संपूर्ण पत्ता खालीलप्रमाणे पाठवायचा.

तुमचं नाव :-
पुस्तकाचं नाव :-
दिलेली पेमेंट :-
पूर्ण पत्ता:-
पिनकोड :-
मोबाईल नंबर :-
बिल हवंय किंवा नकोय

६)या उपक्रमात सर्व आपल्या मर्जीने शामिल झाले आहेत त्यामुळे कोणालाही कुठलीही जबरदस्ती नाही.आणि हा व्यवसाय नसल्याने या मध्ये कोणाचाही लॉस वगैरे नाही..

७)We Read हा आपला एकच ऑफिशियल उपक्रम आहे.त्यामुळे इतर कोणीही या उपक्रमाचा नाव घेऊन तुम्हाला सम्पर्क केला तर खबरदारी घ्यावी आपला उद्देश हा प्रामाणिक आहे.इतरांचा आपण सांगू शकत नाही.तुमची फसवणूक होऊ शकते.

८)तुम्ही आपला Fb Page, टेलिग्राम चॅनेल जॉईन करावा तेथे सुद्धा तुम्हांला पुस्तकासंबंधीत सर्वकाही मिळेल.

सोशल अकाऊंट लिंक :-

https://t.me/Treasureofbooks

https://www.facebook.com/BooksTreasure22/

९)पेमेंट केल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला पुस्तके व्यस्थित पॅकिंग करून भारतीय पोस्टाने पुस्तक पाठवले जातील.जी तुम्हाला ४-६ दिवसांच्या कालावधीत सुखरूपपणे मिळून जातील...

१०)We Read हा 
निस्वार्थी उपक्रम फक्त आणि फक्त पुस्तक प्रेमापोटी
राबवल्या जात असून सर्व पुस्तक प्रेमींचा विश्वास आणि सहकार्य महत्वपूर्ण आहे..💜

धन्यवाद 💜

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼