The Legend Of Mohammad Aziz 💜

#मोहम्मद_अझीझ 💜 काही दिवसांपूर्वी एका मित्राच्या स्टेटस वर " Aye meri mohabaat sun main ye mashwara doonga tu mujhe bhula dena main tujhe bhula doonga " हा एका गाण्यातील थोडासा कडवा बघितला आणि एकंदरीत त्या आवाजाचा चाहता झालो...लगेच युट्यूबवर जाऊन हा गीत Search करून बघितला आणि ऐकतच राहिलो...त्या गाण्याचे Lyrics आणि मोहम्मद अझीझ सरांच्या आवाजाने मी एकदम मंत्रमुग्ध झालो..हा गीत "बिछडा यार मिलादे "या अलबम मधील होता.या गीताचे Lyrics आणि मोहम्मद अझीझ सरांचा आवाज माझ्या मनात घर करून गेला..मोहम्मद अझीझ हा नाव माझ्यासाठी पूर्ण नवीन होता या अगोदर मी त्यांच नाव कधीही ऐकलं किंवा वाचलं नव्हतं.त्यामुळे मी सर्वात अगोदर जाऊन यांच्याबद्दल गुगल केलं आणि एकदम आश्चर्यचकित झालो,मला खरंच एक सुखद धक्काच बसला.कारण मी ऐकलेले,मला आवडलेले १९८०-१९९० च्या दशकातील अर्ध्यापेक्षा जास्त सुपरहिट गाणी मोहम्मद अझीझ सरांनी गायलेली आहेत हे बघून तर मी जाम खुश झालो..त्यांचा वेगळा आवाज आणि गाण्याची वेगळी शैली ही निव्वळ अफलातून होती. ८०/९० च्या दशकातील असा कोणताही व्यक्ती असणार नाही ज्यांनी ही ...