UPSC/CSE साठी मार्गदर्शन करणारी काही पुस्तके भाग - 1 💙

जेव्हा मी पदवीच्या प्रथम वर्षाला असताना मी कोचिंग न करता सेल्फ स्टडी करून मराठी भाषेत सिव्हील सर्विसेसची तयारी सुरू करायचं नक्की केलं होतं.तेव्हा मला विशेष कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन किंवा Cse बद्दल ज्ञान अजिबात नव्हतं.मग मी वेगवेगळे सेमिनार ला हजेरी लावली,शेकडो टॉपर्सचे युट्युब व्हिडिओस बघून माहिती घेतली,अनेक अधिकाऱ्यांचे नंबर्स मिळवून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं...या सर्व गोष्टींचा मला एकंदरीत फायदा झाला.पण मला एकंदरीत म्हणावं तसा मार्गदर्शन काही मिळालं नाही.पण मला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून काही Cse साठी मदत करणारे प्लॅनर बद्दल माहिती मिळाली..म्हणून मी वेगवेगळे प्लॅनर खरेदी करून वाचन सुरू केलं.त्यामधून नोट्स काढून Structure, आराखडा समजून घेतला आणि माझ्या स्वतःची एक वेगळीच Strategy बनवली आणि अभ्यासाला लागलो...या प्लॅनरमुळे मला खूप महत्वपूर्ण आणि उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाला आणि माझ्या अभ्यासाला एक योग्य वळण मिळालं...

मला काही जण नेहमी मी वाचलेल्या आणि मला आवडलेल्या व फायदा झालेल्या प्लॅनरबद्दल विचारत असतात मी त्यांना माझ्यापरीने जमेल तसं उत्तर देत असतो पण आज वेळ काढून मी या टॉपिकवर विशेष एक लेख लिहायचं नक्की केलं.या लेखात मी वेगवेगळ्या प्लॅनरचा थोडक्यात इन्ट्रो करून देणार आहे.जेणेकरून इतरांना याचा मला झाला आणि होत आहे तसा थोडंतरी फायदा होईल..या प्लॅनरमुळे विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम, पुस्तक सूची पासून अभ्यास नेमका कसा करावा,आयोगाला उमेदवाराकडून काय अपेक्षित असते ??वेळेचे नियोजन कसे करावे ??वैकल्पिक विषय कसा निवडावा ??अभ्यास किती तास करावा ??कोणत्या चूका करू नये ?? एकुण पूर्व परीक्षा ते मुलाखती पर्यत एकंदरीत डिटेल्स माहिती या पुस्तकात आपल्याला मिळते.जे वाचून एकदा नोट्स बनवल्यावर आपल्याला इतरांना पुस्तक सूची वगैरे मागायची गरज पडत नाही..आजकल एकंदरीत सर्व माहिती इंटरनेटवर उपलब्ध असून माहितीचा खजिना आपल्यासमोर आहे.पण यामध्ये तथ्यपूर्ण माहिती किती हा मोठा प्रश्न आपल्या समोर आहे.त्यामुळे Cse चा अनुभव असलेल्या लेखकाने किंवा स्वतः Cse मध्ये निवड झालेल्या अधिकाऱ्याने लिहलेल्या पुस्तकाने आपल्याला तथ्यपूर्ण माहिती मिळू शकते आणि इतर ठिकाणी जाणारा आपला वेळ वाचू शकतो...त्यामुळे मी मला फायदा झालेल्या काही मराठी/हिंदी/इंग्रजी भाषेतील प्लॅनर बद्दल येथे थोडक्यात लिहीत आहे.तुम्ही तुमच्या परीने हे प्लॅनर वाचून त्यावर विचार करून ठरवू आपले मत बनवू शकता.या पुस्तकाच्या साह्याने आपल्या पद्धतीने विचार विमर्ष करून एक सटिक रणनीती बनवू शकता..लेख मोठा असल्याने मी या लेखाचे २ भाग करून शेअर करतोय...Hope या लेखाने १% तरी इतरांना माहिती होईल.या लेखाचा उद्देश फक्त आणि फक्त इतरांना पुस्तकांबद्दल माहिती करून देणे असून कोणत्याही पुस्तकाची मार्केटिंग करणे वगैरे नाही याची नोंद घ्यावी...💙

१)IAS मंत्रा -फारूक नाईकवाडे/रोहिणी शहा 

हा ग्रंथ एकंदरीत नागरी सेवेचा बायबल आहे.मराठी भाषेत लिहलेला आणि मराठी माध्यमातून तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खूप महत्वपूर्ण असून हा ग्रंथ उमेदवाराच्या मनात असलेल्या प्रत्येक प्रश्नांच उत्तर खूपच सुंदरपणे देतो..तयारीच्या सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत हा ग्रंथ आपल्या डेस्कवर असायला हवा..या ग्रंथाची खासियत म्हणजे तुम्हाला संपूर्ण वैकल्पिक विषयाचा अभ्यासक्रम मराठी भाषेतून मिळतो..
भारतीय नागरी सेवा:-एक ड्रीम जॉब या टॉपिक पासून सुरू होणारा प्रवास मुलाखत अशी आणि तशी या टॉपिकवर समाप्त होतो आणि Upsc ची Abcd सुद्धा माहिती नसणाऱ्या विद्यार्थ्यांला Upsc बद्दल सर्वकाही माहिती देऊन जातो...३९४ पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकाची पहिली आवृत्ती २७ मे २०११ रोजी झालं होतं तेव्हापासून या पुस्तकाच्या अनेक आवृत्या निघाल्या आहेत..

२)यूपीएससी ,मी आणि तुम्ही - अन्सार शेख (IAS)
अन्सार शेख हा तरुण महाराष्ट्रातील एका छोट्या खेड्यातील एका गरीब कुटुंबातून येऊन देशातील सर्वात तरुण IAS अधिकारी होतो ..आणि इतरांना मार्गदर्शन मिळावे म्हणून आपल्या अनुभवातून एवढ्या कमी वयात एक उत्कृष्ट पुस्तक लिहितो यातच सर्वकाही आलं...या पुस्तकात तुम्हांला यूपीएससी बद्दल सर्वकाही मिळेल.पुस्तक वाचताना तुम्हाला प्रेरणा तर मिळेलच यासोबतच मार्गदर्शन सुद्धा मिळेल..यूपीएससी बद्दल असलेले आपल्या मनातील सर्व doubt अन्सार सर दूर करतात.अभ्यास कसे करावे आणि नेमकी सुरुवात कोठून करावी इत्यादी सर्व प्रश्नांचे उत्तर आपल्याला या पुस्तकात मिळतात..सुरुवातीलाच सरांचे मनोगत वाचून एक प्रेरणा अंगी संचारते त्यांनी घेतलेले कष्ट आणि एक अधिकारी होण्यासाठी काय करावे लागते हे आपल्याला अन्सार सरांच्या अनुभवातून समजते...२७३ पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकांत १४ धडे आहेत जे आपल्याला खूप म्हणजे खूपच मोलाचे मार्गदर्शन करतात...

३)IAS/UPSC प्लॅनर :-मनोहर भोळे
स्पर्धा परीक्षा क्षेत्रातील एक नावाजलेले नाव प्रामुख्याने घेतले जाते ते म्हणजे मनोहर भोळे सर.सरांनी अभ्यास ते अधिकारी हे पुस्तक लिहून Mpsc ची तयारी करणाऱ्या मुलांना मोलाचे मार्गदर्शन केले आहेत.सरांचे राजमुद्रा,Attention Please,मुलाखत इत्यादी काही पुस्तके सुद्धा जबरदस्त आहेत.सरांनी आजपर्यंत शेकडो विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे त्यामुळे सरांची एक वेगळी ओळख स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात आहे..सरांनी यूपीएससी च्या विद्यार्थ्यांना घर बसल्या अभ्यास करता यावा यासाठी A To Z माहितीसह IAS/UPSC प्लॅनर नामक एक पुस्तक लिहलंय जे खूपच उपयोगी असून प्रत्येकाला खूप फायदा देणारा आहे...२६४ पृष्ठसंख्या असलेल्या या पुस्तकात तुम्हांला श्रीमती लीना मेहेंदळे (Ex IAS)माजी अतिरिक्त मुख्य सचिव,महाराष्ट्र राज्य यांची एक सुंदर आणि महत्वपूर्ण प्रस्तावना वाचायला मिळेल..

©️Moin Humanist ✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼