महाभारताचे रहस्य 💙
Mythological किंवा Anthropological Genre हा माझा अगदी आवडता जेनर आहे .. इतिहासातील एखाद्या प्रसंगांचे संदर्भ घेऊन त्याला वर्तमानाची जोड द्यायची व आपल्या कल्पनेने एक भन्नाट कथा गुंफून खजिन्याचा शोध घ्यायचा.जे वाचत असताना आपण पूर्णपणे त्यामध्ये हरवून जातो व बेभान होऊन उत्सुकतेने फक्त वाचत जातो,प्रत्येक Nगोष्टीत सस्पेन्स, थ्रिलर आणि नेमकं आता पुढे काय याची उत्सुकता लागलेली असते..भूतकाळ आणि वर्तमानकाळात समांतर चालणाऱ्या या कथा आपण वाचत असताना आपण जणू त्याकाळातच प्रवास करतोय असं भास आपल्याला होत असतो...
या जेनरची सुरुवात मी प्रतिपश्चंद्र ह्या अप्रतिम कादंबरी पासून केली होती.आणि येथूनच मी या जेनरचा जबरदस्त चाहता झालो.. मग त्यानंतर मी या जेनर मध्ये मोडणाऱ्या आपल्या मराठी भाषेतील कादंबऱ्यांचा शोध घ्यायला सुरुवात केली..मराठी साहित्यात मला प्रतिपश्चंद्र नंतर या जेनर मध्ये येणाऱ्या शोध,असुरवेद आणि विश्वस्त या तीन कादंबऱ्याबद्दल माहिती मिळाली..म्हणून मी लगेच त्या बोलावून वाचल्या आणि अजूनच पुन्हा या जेनर चा चाहता झालो..मराठीत या जेनरचं पुन्हा जास्त काही मला सापडलं नाही म्हणून मी आता इंग्रजी साहित्यात या जेनरचा शोध घेत सुटलो.इंग्रजीत द दा विंची कोड,द कृष्णा की आणि महाभारताचे रहस्य या तीन पुस्तकाबद्दल मला माहिती मिळाली आणि "सोने पे सुहागा" म्हणजे या तिन्ही कादंबऱ्या मराठीत अनुवादित झाल्या होत्या..मग काय " तहानलेल्याला विहीर दिसावी"तशी माझी अवस्था झाली होती म्हणून मी लगेच ही तिन्ही पुस्तके मागवून घेतली आणि द दा विंची कोड पासून वाचायला सुरुवात केली.द दा विंची कोड वाचल्यानंतर मी काही दिवसांपूर्वी वाचायला घेतली क्रिस्टोफार सी.डॉयल सर लिखित "महाभारताचे रहस्य"ही एक शानदार जबरदस्त जिंदाबाद कादंबरी..आणि आता यानंतर वाचायला घेईन आश्विन सांघी लिखित "द कृष्णा की..वाचल्यानंतर त्याबद्दल सुद्धा बोलूच पण आज आपण बोलू मी रात्री वाचून पूर्ण केलेली "महाभारताचे रहस्य "या कादंबरीबद्दल..मूळ इंग्रजी भाषेत असलेल्या या कादंबरीचे प्रकाशन २०१३ मध्ये झाले होते..आणि
ही कादंबरी एक अप्रतिम आणि जबरदस्त रोलर कोस्टर आहे.जो आपल्याला घरी बसल्या बसल्याच एक वेगळ्याच विश्वाची सफर करून आणतो.एक टाईम मशीन आहे जी आपल्या भूतकाळात घेऊन जाते..वाचत असताना आपण यामध्ये पूर्णपणे हरवून जातो.आपण सुद्धा कादंबरीतील एक भाग आहोत एवढं या कादंबरीचा नशा आपल्या मनावर चढतो.कादंबरीतील घडणाऱ्या घटना जणू आपल्या आजूबाजूला घडत आहेत की काय ??असा भास आपल्याला होत असतो..लेखकांनी ज्याप्रकारे ही कादंबरी लिहली आहे त्याला खरंच हॅट्स ऑफ.लेखकांनी केलेली मेहनत आपल्याला कादंबरी वाचत असताना पावलोपावली जाणवते.एकदम सखोल संशोधन, ऐतिहासिक संदर्भ, वैज्ञानिक दृष्टिकोन,रिसर्च इत्यादी बाबी उत्कृष्ट पद्धतीने आपल्याला कादंबरीत दिसतात.सुरुवातीच्या पहिल्या पानापासून तर शेवटच्या पानापर्यत वाचकाला एकाजागी खिळवून ठेवण्यात ही कादंबरी कमालीची यशस्वी झाली आहे.आजच्या काळातील आंतरराष्ट्रीय पातळीवरील चालणाऱ्या घडामोडी, देशांतर्गत राजकारण, गुप्त संदेशांची उकल,भारतीय गुप्तचर संस्था, दहशतवादी संघटन इत्यादी काही गोष्टींची एकदम उत्कृष्ट पद्धतीने गुंफण करून कोठेही ती सैल पडणार नाही याची काळजी लेखकांनी घेतली आहे..काही ऐतिहासिक ठिकाणचं वर्णन लेखकांनी ज्या प्रकारे केलंय ते निव्वळ अफलातून आहे त्यानंतर काही ऐतिहासिक घडामोडीला कल्पनेची जोड उदा :- तालिबान या संघटनेने २००१ साली उद्धवस्त केलेल्या बुद्ध मूर्तीच्या मागे छुप्या गुहा असणे,श्रीकृष्णाच्या हातातील सुदर्शन चक्र कशाप्रकारे काम करतो याबद्दल लेखकाने मांडलेली कल्पना तर भन्नाट आहे...मुळ इंग्रजी या कादंबरीचा मराठीत अनुवाद सुद्धा ज्यापद्धतीने मंजुळ प्रकाशनाने केला आहे त्याला तोड नाही.आपण एक अनुवादित पुस्तक वाचतोय असं आपल्याला कोठेही फील होत नाही ही ताकद या कादंबरीच्या अनुवादात आहे..
४३८ पृष्ठसंख्या असलेली ही कादंबरी आपल्याला कोठेही थोडसं सुद्धा बोअर होऊ देत नाही यातच या कादंबरीचं यश आहे..
कादंबरीचं प्रवासच एवढा अफलातून आणि रहस्यमयी आहे जो काही दिवस सारखा आपल्या मनात गिरक्या घालत असतो.आता पुढे नेमकं काय ?? हाच प्रश्न आपल्याला शेवटपर्यंत सारखा सारखा भेडसावत /सतावत असतो.आणि यातच या कादंबरीचे खरे यश आहे.या कादंबरीवर एक अफलातून यशस्वी वेबमालिका किंवा चित्रपट बनू शकते एवढी या कादंबरीच्या कथेत ताकद आहे..कादंबरीतील प्रत्येक पात्र कादंबरी वाचून पूर्ण झाल्यानंतर सुद्धा आपल्याला डोळ्यासमोर वावरताना दिसतो एवढं आपण यामध्ये बुडून जातो.विक्रम,विजय,कोलीन, राधा,इम्रान इत्यादी काही पात्रांशी आपण आपल्या स्वतःशी रिलेट करत असतो तर फारूक सारख्या पात्राचा द्वेष सुद्धा करतो..
(आता कोणतेही स्पॉयलर न देता अगदी थोडक्यात आपण या कादंबरीचा गाभा बघूया....)
भूतकाळ :-
ख्रि.पूर्व २४४
२३०० वर्षांपूर्वी आपल्या महान सम्राट अशोक व त्यांचा सरदार असलेला सुरसेन यांना जगाचा विनाश करणाऱ्या एका प्राचीन आणि भयावह रहस्याचा शोध लागतो.
ते रहस्य खोलवर गाडून टाकण्यात येतो कारण त्या रहस्यात जगाचा विनाश करण्याची ताकद असल्याने .ते रहस्य जगापासून लपवून ठेवण्यात येते..हे रहस्य जगासमोर आले, तर हाहाकार होईल आणि जगाचा विनाश होईल.त्यामुळे या भयावह रहस्याला रहस्यच राहू द्यावे,हा निर्णय सम्राट अशोक घेतात आणि त्यांच्या ९ विश्वासू सरदारांना गोपनीयतेची शपथ देऊन हे रहस्य पृथ्वीच्या पोटात दडवून ठेवण्याची अवघड कामगिरी त्यांच्यावर सोपवतात..
महाभारत १८ पर्वामध्ये विभागले गेले आहे, हे सर्वांना माहिती आहे पण यामध्ये एका पर्वाचा उल्लेख नाही.हे पर्वच महाभारतातून गायब केले गेलेले आहे. ‘विमान पर्व’ असे या पर्वाचे नाव आहे..या पर्वात जगाचा विनाश करण्याची शक्ती असलेल्या रहस्यांबद्दल माहिती होती.त्यामुळे हा पर्वच महाभारतातून सम्राट अशोकांनी वगळला होता..
आता या पर्वात नेमक्या कोणत्या रहस्यांबद्दल माहिती होती ??
सम्राट अशोकाला त्या रहस्याचा शोध कसा लागला होता ??
ते ९ सरदार या रहस्याला कशाप्रकारे दडवून ठेवतात ??
ते पर्व महाभारतातून कशाप्रकारे वगळले होते आणि कोणी ??
वर्तमानकाळ :-
महाभारतकालीन ते रहस्य पुढच्या पिढय़ांपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारीही त्या नऊ सरदारांवर सोपवलेली असते हे आपण मागे बघितलंच आहे.हे ९ सरदार त्यांच्या विश्वासातील लोकांपर्यंत हे रहस्य सोपवून आपल्या जीवनाची यात्रा संपवतात. अश्याप्रकारे ही साखळी आजच्या युगातील म्हणजेच वर्तमानातील निवृत्त अणुशास्त्रज्ञ विक्रम सिंग यांच्यापर्यंत येऊन पोहोचलेली असते.२१ व्या शतकात मात्र या रहस्याचा सुगावा लष्कर-ए-तोयबा सारख्या या दहशतवादी संघटनेला लागतो आणि या संघटनेतील फारूक नामक दहशतवादी त्या रहस्येपायी विक्रम सिंग यांचा खून करतो...पण मृत्यूच्या आधीच विक्रम सिंग आपल्या अमेरिकास्थित पुतण्या विजय साठी काही ई-मेलसच्या माध्यमातून काही विशेष गुपित संकेत ठेवतो. या पाचही मेलचा उलगडा करण्यासाठी विजय भारतात येतो. त्याला या कामात त्याचा अमेरिकन मित्र कॉलिन, बालपणीची मैत्रीण राधा, मगधी व एकूणच सांकेतिक भाषांचे उत्तम ज्ञान असलेले राधाचे वडील डॉ. शुक्ला इत्यादी काही मंडळी मदत करतात.. यांच्या या शोधमोहिमेत ते शक्तिशाली दुष्ट दहशतवादी शक्तींच्या पाठलागामुळे भूतकाळातील तो रहस्य आणि वर्तमानात चाललेल्या कारस्थानाच्या कचाड्यात सापडतात..विजय आणि त्याचे मित्र त्या ई-मेलसच्या साह्याने तो गूढ शोधत असताना असंख्य वेळा त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो..या शोध मोहिमेत ते भारतातील असंख्य ठिकाणी जाऊन त्या रहस्याचा शोध घेतात..पण त्यांच्यावर गोपनीय पद्धतीने पाळत ठेवली जात आहे हे त्यांच्या लक्षात येत नाही आणि जेव्हा त्यांना याबद्दल समजते तेव्हा खूपच उशीर झालेला असतो.या एका छोट्याश्या चुकीने मुळे ते एका मोठ्या अडचणीत सापडतात..पण तरीही ते अखेर असंख्य संकटांचा सामना करत ते तो गुढ शोधण्यात यशस्वी होतात..
आता नेमकं पुढे काय ??
तो गूढ रहस्य शोधल्यावर शेवटी त्याचं काय होतो ??
त्यांच्यावर छुपी पाळत कोण ठेवत असतो ??
विक्रम सिंगाची हत्या नेमक्या कोणत्या कारनाने होते ??
आणि मुख्य म्हणजे तो रहस्य काय असतो ??
इत्यादी असंख्य प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या कादंबरीतच मिळतील..त्यामुळे ही कादंबरी एक मस्ट रीड आहे जी वाचायलाच हवी..💙
©️Moin Humanist ✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा