UPSC/CSE साठी मार्गदर्शन करणारी काही पुस्तके भाग - 1 💙

जेव्हा मी पदवीच्या प्रथम वर्षाला असताना मी कोचिंग न करता सेल्फ स्टडी करून मराठी भाषेत सिव्हील सर्विसेसची तयारी सुरू करायचं नक्की केलं होतं.तेव्हा मला विशेष कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन किंवा Cse बद्दल ज्ञान अजिबात नव्हतं.मग मी वेगवेगळे सेमिनार ला हजेरी लावली,शेकडो टॉपर्सचे युट्युब व्हिडिओस बघून माहिती घेतली,अनेक अधिकाऱ्यांचे नंबर्स मिळवून त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतलं...या सर्व गोष्टींचा मला एकंदरीत फायदा झाला.पण मला एकंदरीत म्हणावं तसा मार्गदर्शन काही मिळालं नाही.पण मला वेगवेगळ्या अधिकाऱ्यांकडून काही Cse साठी मदत करणारे प्लॅनर बद्दल माहिती मिळाली..म्हणून मी वेगवेगळे प्लॅनर खरेदी करून वाचन सुरू केलं.त्यामधून नोट्स काढून Structure, आराखडा समजून घेतला आणि माझ्या स्वतःची एक वेगळीच Strategy बनवली आणि अभ्यासाला लागलो...या प्लॅनरमुळे मला खूप महत्वपूर्ण आणि उत्कृष्ट मार्गदर्शन मिळाला आणि माझ्या अभ्यासाला एक योग्य वळण मिळालं... मला काही जण नेहमी मी वाचलेल्या आणि मला आवडलेल्या व फायदा झालेल्या प्लॅनरबद्दल विचारत असतात मी त्यांना माझ्यापरीने जमेल तसं उत्तर देत असतो पण आज वेळ काढून ...