निसर्गमित्र जॉन म्युर 💜

काही दिवसांपूर्वी “निसर्गप्रेमी जॉन म्युर” या अप्रतिम पुस्तकाचा सुंदर आणि अफलातून प्रवास संपला..या प्रवासात मला खूप काही शिकायला मिळाले.निसर्गावर प्रेम करणारा अवलिया जॉन म्युर हे व्यक्तिमत्त्व थोडक्यात समजले..वॉल्डन वाचल्यानंतर मला दोन व्यक्तींच्या बद्दल विशेष माहिती घ्यायची.ते दोन महान व्यक्तिमत्वे म्हणजेच निसर्गवादी जॉन म्युर आणि दुसरे पक्षीप्रेमी सलीम अली सर हे होय..म्हणूनच मी सुरुवातीला जॉन म्युर यांच्याबद्दल इंटरनेट व इतर काही ठिकाणावरून माहिती घेतली आणि आता राजहंस प्रकाशन प्रकाशित हे छोटेखानी पुस्तक वाचायला घेतले आणि एकाच बैठकीत हे पुस्तक वाचून संपवले..

या पुस्तकातून निसर्गवादी जॉन म्युर गुरू बद्दल खूप काही नवीन माहिती मिळाली आणि पुन्हा त्यांच्याबद्दल खूप खूप काही जाणून घेण्याची इच्छा निर्माण झाली.निसर्गवादी गौतम बुद्ध,डेविड हेनरी थोरो यांच्या नंतर जॉन म्युर सर हे निसर्गाच्या बाबतीत माझे तिसरे गुरू आहेत.या तिन्ही जनांचे निसर्गाबद्दलचे विचार वाचून मी भारावून गेलोय.निसर्ग,प्राणी,पक्षी,झाडं,नदी आणि इत्यादी प्रत्येकावर प्रेम करायला मला या तिन्ही जणांनी शिकवलं आहे..यातूनच एक जॉन म्युर सर हे एक लोकोत्तर पुरुष होते.निसर्ग आणि पर्यावरण यांच्या रक्षणाचा महत्व त्यांनी अमेरिकेतील लोकांना पटवून देण्याचं महान कार्य त्यांनी आयुष्याच्या अंतापर्यंत केलं.फक्त निसर्ग,पर्यावरण यांच्या रक्षणासाठी झटणाऱ्या निसर्गवादी,निसर्गप्रेमी महान लोकांमध्ये जॉन म्युर हे सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्व होते..२१ एप्रिल हा त्यांचा जन्मदिवस “जॉन म्युर दिवस”म्हणून दरवर्षी कॅलिफोर्निया राज्यात साजरा केला जातो.त्यांच्या नावाचं पोस्टाच तिकीट काढलं गेलं आहे,अनेक निसर्गस्थळांना त्याचं नाव दिलं गेलं आहे. अशा प्रकारे अमेरिकन सरकार व जनतेने त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.

आजच्या युगात या थोर व्यक्तिमत्वाचे विचार खूप खूप प्रासंगिक असून यांचे विचार समोरून ठेवूनच आपल्याला चालावे लागेल तेव्हाच आज होणारा निसर्गाचा वरहास आपण थांबवू शकू..अन्यथा भविष्यात आपल्याला भयानक परिणाम भोगावे लागणार एवढं मात्र नक्की.. “अमेरिकेतील अभयारण्यांचा जनक “अशी पदवी मिळालेल्या जॉन म्युर यांच्याबद्दल जेवढं वाचावं तेवढं कमीच आहे..जॉन सरांची जन्मभूमी स्कॉटलंड ही होती.२१ एप्रिल १८३८ रोजी डनबार येथे त्यांचा जन्म झाला.वयाच्या १० व्या वर्षी म्युर कुटुंब अमेरिकेतील विस्कॉनसिंन या राज्यात स्थायिक झाला.जॉन म्युर यांचे वडील कडक शिस्तीचे आणि धार्मिक वृत्तीचे होते,त्यांच्या नजरेखाली जॉनच बालपण शेतात राबण्यातच संपून गेलं.त्यांना शिक्षणाची प्रचंड आवड व शिकण्याची ओढ होती.योग्य आणि पारंपरिक शिक्षण मिळालं नसलं तरी त्यांनी आपल्या संशोधक वृत्तीने शेतीला उपयुक्त अशी उपकरणं त्या काळात बनवली होती..फक्त लाकडाचा वापर करूनच त्यांनी दैनंदिन उपयोगाची काही उपकरणं बनवायला सुरुवात केली होती.त्यांनी पुस्तके वाचून व आपल्या संशोधन उत्तीने Self-Setting Saw mill, लाकडी घड्याळ,थर्मामिटर,बॅरोमिटर आणि Early Rising Machine इत्यादीं उपकरण त्यांनी त्या काळात बनवले.

बालपणापासूनच त्यांना निसर्ग व पर्यावरण निरीक्षणाची आवड होतीच.यासोबतच त्यांना वाचनाचा सुद्धा छंद होता..मिळेल तेथून त्यांनी पुस्तके जमवून वाचली आणि ज्ञान संपादित केला.शिक्षणाचा ध्यास घेऊन त्यांनी वयाच्या २१ व्या वर्षी विस्कॉनसिन विद्यापीठात मोठ्या प्रयत्नांनी प्रवेश मिळवला.तिथं शिकवत असताना त्यांनी विद्यार्थ्यांना उपयुक्त असं मशीन बनवलं.अमेरिकतील यादवी युद्धामुळे त्यांना आपलं शिक्षण अर्धवट सोडावं लागलं.येथून त्यांची भटकंती सुरू झाली जी आयुष्याच्या शेवटपर्यंत सुरूच होती.त्यांनी आपल्या आयुष्यात मिळेल ते काम केले..शेतीत कष्ट करण्यापासून तर मेंढपाळासोबत सुपर वायझर बनून ते गेले.निसर्गसनिध्यात राहण्यासाठी ते भटके बनले.झाड,नद्या,विविध वनस्पती,डोंगरदऱ्या यांच्या निरीक्षणासाठी त्यांनी हजारो मैलांचा प्रवास पायी केला.या प्रवासातच ते #योसेमिटी_व्हॅलीत पोहोचले.आणि पुढे हीच त्यांची कर्मभूमी बनली.येथे राहून त्यांनी वनरक्षणासाठी अखंड,अविरत असा धडा दिला.त्यासाठी त्यांनी सातत्यानं आपल्या लेखणीचा वापर केला.दैनिक,मासिकं यातून त्यांनी असंख्य लेख लिहिले,पुस्तकं लिहिली.या करण्यासाठीच त्यांच्या प्रेरणेंन “सिएरा” क्लबची स्थापना झाली.वृक्षसंवर्धन आणि पर्यावरण रक्षण करणारा हा क्लब आजही अस्तिवात आहे आणि योग्य पद्धतीने तो आपले कार्य करतोय ..

जॉन म्युर हे नाव अमर झालं आहे.त्यांच्याबद्दल वाचत असताना मी भारावून गेलोय त्यांचे कार्य खरंच महान होते.शेवट वाचत असताना मनात वेगळीच भावना निर्माण झाली..
हेचहेची व्हॅलीत धरण होऊ नये म्हणून जॉन सरांनी अनेक प्रयत्न केले तेच धरण बांधण्यास सरकारनं हिरवा कंदील दाखवला तेव्हा या निर्णयाने जॉन म्युर फार खचले त्यांची उमेद संपली आणि त्यांची एकंदरीत जगण्याची इच्छा मावळली आणि २४ डिसेंबर १९१४ रोजी त्यांचं निधन झालं आणि हा निसर्गप्रेमी आपल्याला सोडून निघून गेला..

जॉन म्युर यांनी निसर्ग संवर्धनासाठी जो लढा दिला त्याला खरंच तोड नाही.अमेरिकीतील समृद्ध असलेली वनसंपदा नष्ट होऊ नये त्यांनी जीवनभर कष्ट केले..त्यांच्या अतोनात प्रयत्नामुळेच अमेरिकेत “नॅशनल पार्क्स ” ची निमिर्ती झाली.त्यांच्या लेखणीने अमेरिकेत निसर्ग रक्षण आणि पर्यावरण संतुलन याबाबत जनजागृती झाली..आज त्यांचं नाव अनेक राष्ट्रीय उद्यानाला दिलेलं आहे .म्युर माऊंटन,म्युर ट्रेल, म्युर लेक,म्युर रेडवूड फॉरेस्ट,म्युर ग्लेशियर्स इत्यादी अनेक निसर्ग स्थानाच्या रुपांन त्यांची समूर्तीं चिरंतन राहणार आहे..

©️ Moin humanist✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼