खुशबू 💜


नितीन थोरात लिखित खुशबू हा कथासंग्रह ३ दिवसांपूर्वी एकाच बैठकीत वाचून पूर्ण केला आणि तेव्हापासून एकंदरीत विचारात गुंतलो.खुशबू या पुस्तकात समाजातील प्रत्येकाच्या कथा आहेत ज्या आपल्याला विचार करायला भाग पाडतात.आपण आपल्या स्वतःला खूप चांगले आणि भारी समजतो पण तोच चांगुलपणाचा बुरखा टराटरा फाडायचा काम करते खुशबू..झोपलेल्या समाजाला भावनिक व विचार करायला भाग पाडणाऱ्या कथेतून उठवण्याचं काम करते खुशबू....नितीन थोरात सरांच्या लेखणीत खरंच अक्षरशः जादू आहे.त्यांच्या लेखणीला तोड नाही.खुशबू पुस्तकातील प्रत्येक कथा ही आपल्याला आपल्या स्वतःची वाटत असते आणि यातच सरांचा विजय आहे.नितीन सरांनी खुशबू पुस्तकाच्या रूपात वाचकांसमोर एक आरसा धरला आहे ज्याच्यात आपण आपला खरा प्रतिबिंब बघू शकतो.

आपण समाजात जसे बनून वावरतो,आपण खरंच तसे आहोत का ??हा प्रश्न आपल्याला खुशबू वाचत असताना पडतो.चेहऱ्यावर खोटे मुखवटे घालून आपण समाजात वावरत असतो तोच मुखवटा खुशबू काढून फेकून देते. खुशबुतील प्रत्येक कथा खूप काही असं शिकवून जाते,मोठं मोठे ग्रंथ वाचून आपल्याला ज्या गोष्टी उमजत नाही त्या गोष्टी खुशबूतुन आपल्याला उमजतात.एकंदरीत जीवन जगण्याची कला काही प्रमाणात आपल्याला खुशबू शिकवुन जाते. प्रत्येक कथा आपल्याला भावनिक करते,हसवते आणि छोट्या छोट्या गोष्टींतून आपल्याला काही अशा महत्वपूर्ण बाबीवर विचार करायला भाग पाडते ज्या बद्दल आपण कधीही विचार करत नाही.खुशबू आपल्या कथेतून आपल्याला आपल्या समाजातील खूप साऱ्या गोष्टीच दर्शन घडवते.पुस्तकातील तकलिफ या कथेपासून सुरुवात होऊन शेवटच्या बाहुली या कथेपर्यत अक्षरशः आपण खुशबू जगतो आणि खुशबुच्या प्रेमात पड पडतो.खुशबू या पुस्तकाचा प्रवास माझ्यासाठी उत्कृष्ट आणि जबरदस्त ठरला.आणि एक गोष्ट मनाला पटवून गेला की खरंच

 "खरं जगणं अवघड असतं,
पण खोटं जगण्यापेक्षा सोपं असतं.

त्यामुळे एकदा वाचून मन भरलं नसल्याने पुन्हा एकदा खुशबू वाचुन इतर कोणा दुसऱ्याच्या स्वाधीन करीन आणि त्याचा खोटा मुखवटा बाजूला करायला हेल्प करीन...❣️
Thank U So Much रायटर आम्हाला आमचं खरा प्रतिबिंब दाखवल्याबद्दल..❣️

©️Moin Humanist ✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼