शिरसवाडी 💜
ज्या दिवशी शिरसवाडीची बुकिंग सुरू झाली त्याच क्षणी मी कादंबरी ऑर्डर केली होती पण सरांच्या काही समस्येमुळे कादंबरी मिळायला उशीर झाला.चातक पक्षी ज्याप्रमाणे पावसाची वाट पाहत असतो त्याप्रमाणे मी #शिरवाडीची वाट बघत होतो.. फेसबुक व इतर ठिकाणी समीक्षण वाचून मन बैचेन होत होत की कधी वाचतो आणि कधी नाही पण नाईलाज असल्याने शांत बसलो.फेसबूक वरील आवडत्या व्यक्तीमत्वाने लिहलेली कादंबरी लवकरात लवकर वाचून त्यांच्या पाठीवर शब्द रुपी थाप मारायची होती कारण माहिती होतं गणेश बर्गे या माणसाने लिहलेली कादंबरी #शानदार_जबरदस्त आणि #जिंदाबादच असणार यात काही वादच नाही आणि जशी अपेक्षा होती कादंबरी त्या पेक्षा जबरदस्त निघाली..
काही दिवसांपूर्वी सरांचा फोन आला त्यांनी वाचली का ? हा प्रश्न विचारला पण नेमक्याच तेव्हाच ऑनलाईन परीक्षा सुरू असल्याने वाचायला जमली नव्हती मग दुसऱ्याच दिवशी सकाळी वाचन सुरू केलं आणि 3 तासांतच कादंबरी वाचून finish केली.शिरसवाडीचे वाचन काही दिवसांपूर्वीच संपले..तेव्हापासून मी शिरसवाडीच्या मोहात अडकलेलो आहे..या कादंबरीचा एकंदरीत हँग ओव्हर माझ्या मनावर चढलेला आहे..मला असे वाटत आहे की जणू मी सुध्दा #शिरसवाडी या गावाचाच एक भाग आहे.कादंबरीतील प्रत्येक पात्र हा माझ्या डोळ्यासमोरून जाता जात नाही.लेखकांनी एवढ्या सोप्या आणि उत्कृष्ट अस्सल ग्रामीण भाषेत ही कादंबरी लिहिली आहे त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. गणेश बर्गे सरांची ही पहिलीच वेळ आहे असे वाचताना कधीही वाटत नाही..
ग्रामीण भागाचे अप्रतिम दर्शन सरांनी या जबरदस्त कादंबरीतुन आपल्याला सुंदररित्या करून दिले आहे.शिरसवाडी या छोट्याशा गावाला व या गावातील पात्रांना एवढ्या जबरदस्त पद्धतीने रंगवले आहे जे वाचत असताना आपल्याला माळ गुडकर सरांच्या #बनगरवाडीची आठवण आल्या शिवाय राहत नाही..
कादंबरी वाचत असताना जणू आपण एखादा सुंदर चित्रपट बघतोय की काय असा आपल्याला भास होतो.वाचन संपल्यानंतर सुद्धा कादंबरीतील अनेक पात्र आपल्या मनात घर करून जातात.ज्यांना विसरणे शक्य होत नाही..लव,रुपाली,जयू,शितल,तानाजी तात्या,बाळूनाना इत्यादी.प्रत्येक पात्र हा आपल्याला आपलाच वाटायला लागतो..
साधी सरळ कथा जी आपल्याला हसवते तर खूप रडवते आणि माणुसकीचे एकंदरीत दर्शन घडवून देते..ही कादंबरी वाचत असताना देशातील प्रत्येक गाव हा शिरसवाडीसारखा झाला पाहिजे असे वाटत राहते.जेथे जरी गरिबी असेल,सुख सुविधांचा तुटवडा असेल पण माणुसकीची श्रीमंती अफाट असेल,एकमेकांना जीव लावणारी हक्काची माणसे असतील,घर जरी कच्चे असतील पण मनाचे नाते हे मात्र पक्के असतील..शिरसवाडीतुन खूप काही असं शिकायला मिळते..मैत्री,प्रेम,एकता आणि मदतीचे वेगळे अर्थ आपल्याला समजते..आयुष्यात कितीही दुःख असले तरीही त्यावर मायेची,आपुलकीची फुंकर घातल्यावर ते दुःख नाहीसे होतात आणि जगणं सोयीचं होतो याची प्रचिती आपल्याला शिरसवाडी वाचत असताना येते..
एकदा हातात घेतल्यावर आता नेमकं पुढे ?? काय याचीच उत्सुकता आपल्याला शेवटपर्यंत लागलेली असते.लेखकांची अस्सल गावरान भाषा आपल्याला शेवटपर्यंत गुंतवुन ठेवते.शेवटच्या काही पेजेस पर्यत आपल्याला वाटते की एक सुखद आणि Happy Ending होईल पण आपण येथेच पूर्णपणे चुकतो.शेवटचा भाग वाचत असताना आपल्याला लेखकांनी जो धक्का दिला त्याबद्दल न बोललेच बरं ते तुम्ही वाचूनच ठरवावं असे मला वाटते..कादंबरी वाचून संपल्यावर आपण निःशब्द होतो आणि विचारांच्या चक्रात एकंदरीत गुंतून जातो.शिरसवाडीच्या प्रवासाला जाणे हे एक भन्नाट अनुभव आपल्यासाठी ठरतो..
या कादंबरीत प्रेम,मैत्री,खेळ,आपुलकी,एकता,गरिबी,माया,दुःख,सुख, सर्वकाही आहे जे एका उत्कृष्ट कादंबरीत असायला हवे.त्यामुळे प्रत्येकाने एकदा ही कादंबरी नक्कीच वाचावी आणि इतरांना सुद्धा वाचायला सुचवावे ही विनंती...
कादंबरीच्या कथेबद्दल मी जाणून बुजून काही लिहलं नाही कारण अनेकांनी भरभरून लिहलेलं आहेच आणि थोडक्यात मी याबद्दल लिहुच शकत नाही त्यामुळे तुम्ही वाचूनच याचं अनुभव घ्यावा..
©️Moin Humanist✍️
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा