मी फुलनदेवी 💜



२०१९ मध्ये मी या पुस्तकाचा मराठी अनुवाद प्रकाशित होताच हे पुस्तक वाचून काढलं होतं.तेव्हापासून आतापर्यंत कमीत कमी २ ते ३ वेळा मी पुन्हा हे पुस्तक वाचून काढलंय.कारण Bandit Queen हा चित्रपट बघितल्यापासूनच मला फुलनदेवी बद्दल जाणून घ्यायची उत्सुकता लागलेली होती.एका साध्या सुध्या महिलेला हातात बंदूक घेण्याची नेमकी गरज का पडली मला हे जाणून घ्यायचं होत.चित्रपट बघून मी इंटरनेट व इतर ठिकाणी काही तुटकी फुटकी माहिती वाचली पण मला विशेष आणि विस्तृत जाणून घ्यायला काही मिळालं नाही.अशातच मेहता पब्लिकेशन यांच्या वेबसाईटवर माझ्या नजरेस हे पुस्तक पडले आणि मी लगेच ओर्डर करून ते बोलावून घेतले.काही दिवसांत हे पुस्तक मला येऊन मिळाले आणि मी इतर काम बाजूला सोडून हे पुस्तक वाचायला सुरुवात केली.२ दिवसांतच या पुस्तकाचा प्रवास समाप्त झाला.पुस्तक वाचून पूर्ण केल्यानंतर मी एकंदरीत सुन्न आणि थक्क झालो..जातीव्यवस्था,भेदभाव,महिलांचे शोषण,बलात्कार इत्यादी नेहमी कानांवर पडणाऱ्या शब्दांची मला घृणा येत होती.या पुस्तकाने मला एक वेगळं दृष्टिकोन दिलं.कोणतेही स्त्री ही अबला किंवा कमजोर नाही..स्त्री एवढं शक्तिशाली मनुष्य या पृथ्वीतलावर कोणीच नाही याची मला प्रचिती आली.स्त्रीला कोणाच्याही सहानुभूतीची गरज नव्हती आणि नसणार जेव्हा जेव्हा प्रश्न तिच्या आब्रु किंवा इज्जती चा येईल तिच्या रक्षणाचा,मान सन्मानाचा येईल तेव्हा ती कोणत्याही शक्तीशी लढा द्यायला माग पुढं बघणार नाही एवढं नक्की....

१९९४ साली फुलन देवीची जेल मधून सुटका झाल्यानंतर लेखकांनी फुलनदेवीचा शोध घेतला व फुलनदेवीची संमती मिळाल्यानंतर तिची जीवन कहाणी तिच्याच शब्दांत रेकॉर्ड  केली आणि नंतर टेपवरून ती शब्दात उतरवली आणि हे पुस्तक प्रकाशित केलं .हे पुस्तक पूर्ण होण्यासाठी २ वर्ष लागले आणि आता मूळ इंग्रजी मध्ये असलेल्या या पुस्तकाच मराठी मध्ये अनुवाद डॉ जोगळेकर सरांनी केलयं आणि मेहता प्रकाशन नी हे पुस्तक जानेवारी २०१९ मध्ये प्रकाशित केल आहे....आधीच सांगितल्याप्रमाणे फुलन देवी यांच्या जीवनचरित्रावर  शेखर कपुर यांनी बनवलेला Bandit_Queen हा चित्रपट मी 
किती वेळा बघितला असेल याचा नेम नाही. चित्रपट बघितल्यापासूनच मला फुलनदेवी यांच्या बद्दल जाणून घेण्याची खूपच इच्छा होती..त्या चित्रपटामध्ये दाखवला गेलेला प्रत्येक दृश्य बघून अंगावर काटा येतो आणि आपल्या समाजाचा भयानक चेहरा आपल्याला त्यामधून दिसतो.त्या चित्रपटात अनेक असे प्रसंग दाखवले गेलेले नसून नाही व काही प्रसंग खरे सुद्धा नाही कारण तो सिनेमा फुलन देवी यांची परवानगी घेऊन बनवलेला नाही असं मी एके ठिकाणी ऐकलं होत..पण या पुस्तकामध्ये फुलनदेवीनी स्वतः लेखकांना आपली जीवन कहाणी सांगितली आहे त्यामुळे हे पुस्तक वाचणे मस्ट आहे..

या पुस्तकातुन आपल्या समाजाचा भयानक व कुरूप चेहरा आपल्याला दिसतो..जातिव्यवस्था,गरिबी,उच-निच,भेदभाव,स्त्रियांना दिली जाणारी हीन वागणूक,यौनशोषण,बालविवाह,कर्मठपणा, अज्ञान,रूढी-परंपरा,अंधश्रद्धा,हुंडा,भ्रष्टाचार इत्यादी  अनेक अश्या समस्यांवर हे पुस्तक भाष्य करत असते.गुन्हेगार किंवा समाजाशी विद्रोह करणारे लोक हे आपल्याच समाजाचे घटक असतात ते अचानक गुन्हेगार का बनतात ??या गोष्टी बद्दल आपलं समाज कधी विचार का करत नाही ?? आपण फुलन देवीचंच उदाहरण बघू.. एक साधी-सुधी घरातील,शेतातील काम करणारी  मुलगी हाता मध्ये बंदूक घेऊन गोळ्या चालवण्यासाठी का प्रवृत्त होते ?? या गोष्टीला समाज सुद्धा जबाबदार नाही का?? असे अनेक प्रश्न आपल्याला हे पुस्तक वाचत असताना पडत असतात..फुलन देवी चा ऐकून जीवन संघर्ष हा ऐकून खूपच दुःखद आहे...पुस्तक वाचत असताना मी कीती वेळा रडलो याच मला सुद्धा भान राहील नव्हतं..फुलनच्या कथेतून आपल्याला आपल्या समाजरचनेबद्दल खूप माहिती मिळते..गुन्हेगार, पोलिस, डाकू, आणि डाकुंचा राजकारणासाठी उपयोग करणारे मतलबी सत्ताधारी..अशा अनुभवांचे प्रत्ययकारी चित्रण फुलनच्या आत्मकथेतून वाचले की मन अंतमूर्ख होते..😶

उत्तर प्रदेशातील एका गरीब मल्लाह (मल्लाह जातीचे लोक मासेमारी किंवा नावड्याचा व्यवसाय करणारे )जातीच्या कुटुंबात फुलनचा जन्म होतो.वसंतोत्सव च्या दिवशी जन्म झाला म्हणून तिचं नाव #फुलन ठेवण्यात आलं ..तिचा बाप्पा हा खूपच गरीब आणि दुर्बल होता व माय स्वभावात जरा कडक आणि रुबाबदार होती.फुलनच्या बापाची सारी जमीन त्याच्याच सख्या भावाने कपटीने  घेऊन टाकली होती.फुलन घरच सर्व काम करीत असे,दुसऱ्यांच्या शेतात राबने, गाई म्हशीं मागे जाणे, शेतातुन गवत कापून आणणे,जळतन आणणे,कधी कधी बापासोबत गवंडी कामाला जाणे,इत्यादी इत्यादी..त्यांची आर्थिक परिस्थिती ही खुपच बिकट होती त्यांना कधी कधी उपाशीच राहावं लागतं असे..

मोठ्या बहिणी नंतर वयाच्या ११ व्या वर्षीच फुलनच लग्न त्याच्या बापाच्या वयाच्या इसमासोबत झालं.त्याने गौंणा होण्याच्या अगोदरच तिला आपल्या सोबत नेलं व त्याने नाबालिग फुलनच यौन शोषण केलं,तिचा मानसिक,शारिरीक छळ केला तो तिला नेहमी मारहाण करीत असे..पुढे फुलन तिच्या गावी परत आली व ती पुन्हा पहिल्या सारखं काम करू लागली.पण इकडं आता गावकरी तिचं छळ करू लागले,तिला गावातुन हाकलून लावा अस म्हणू लागले कारण नवरा नसलेली बाई गावात राहणे ही चांगली गोष्ट त्यांच्यासाठी नव्हती.. वयाच्या १५ व्या वर्षी फुलनवर बलात्कार झाला. तो सुद्धा तिच्याच माय बापासमोर हे वाचायलाच किती बेक्कार वाटते.
बलात्कार करणारा सरपंचाचा मुलगा असतो.फुलन पोलिसांना मदत मागते पण पोलिस सुद्धा तिची मदत काही करत नाही. सरपंच आणि तिचा चुलत भाऊ तिच्यावर डाकू असण्याचं खोटं आरोप लावून तिला व तिच्या बापाला  पोलिसाच्या हवाली देतात.येथे काही पोलिसच फुलनवर बलात्कार करतात व तिला कोणालाही न सांगण्याची धमकी देतात.

जेल मधून सुटल्यावर डाकू बाबू गुज्जर तिला उचलून नेतो व तिला मारहाण करुन तिच्यावर बलात्कार करतो. हे बघून त्याच्याच टोळीतील विक्रम मल्लाह नामक डाकू बाबू गुज्जरला ठार करतो व फुलनला वाचवतो.पुढे तो फुलनशी लग्न करून तिला आपल्या टोळीत सहभागी करून घेतो..येथूनच सुरू होते सुरुवात फुलनच्या डाकू बनण्याची.... आता येथून फुलनच्या आत्मसमर्पणा पर्यतची कहाणी तुम्ही स्वतःपुस्तकाच वाचावी...अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हांला पुस्तकात मिळतील..🙏

©️ Moin Humanist ✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼