पृथ्वीवर माणूस उपराच 💜

मागच्या वर्षी लॉकडाउन मध्ये मी अनेक पुस्तके वाचली,त्यापैकी बऱ्याच पुस्तकांबद्दल मी जमेल तसं लिहिलं आहे तर काही पुस्तकांच्या बद्दल लिहायचं बाकी राहिलं आहे. त्यामुळे आता आणि मागे वाचलेल्या अप्रतिम आणि सुंदर पुस्तकांचा अनुभव मी लिहायचं प्रयत्न करतोय..So आज मी मागे काही महिन्यांपूर्वी वाचलेलं पुस्तक #पृथ्वीवर_माणूस उपराच या भन्नाट पुस्तकांबद्दल माझं अनुभव येथे मांडतोय..

एकदम भन्नाट,मजेदार,अफलातून आणि रोमांचकारी माहिती देणारे व अनेक प्रश्न आपल्या समोर उभे करणारे हे एक छोटेखानी (८४पाने) हे पुस्तक आहे.लेखकांनी अनेक देशातील विविध रहस्यमयी ऐतिहासिक ठिकाणांची माहिती या पुस्तकामध्ये दिलेली आहे..सुरेशचंद्र नाडकर्णी लिखित हे पुस्तक विज्ञानामधील एका वेगळ्या संशोधनाची माहिती देणारे हे पुस्तक खूपच उठकंठावर्धक असून एकदा नक्कीच वाचायला हवे..मानवी जीवनातील अनेक प्रश्नांची उत्तरे आपल्याला आजपर्यंत सापडलेली नाही.मानवाची उत्पत्ति नेमकी कशी झाली ?? याबद्दल सुद्धा अनेक प्रश्न आजपर्यंत अनुत्तरित आहेत.मानव हा खरंच पृथ्वीचा सावत्र अपत्य आहे ?आज एवढं प्रगत तंत्रज्ञान असताना सुद्धा प्राचीन काळात त्या वास्तू कशाप्रकारे बनवल्या गेल्या असतील ??माणूस हा परग्रहावरून आलेला आहे का ??इत्यादी प्रश्नांचा शोध घेताना हे पुस्तक दिसते..

व्हॉन डेनिकेनच्या अफाट संशोधनाचा मागोवा घेत मानवाच्या अनैसर्गिक निर्मितीबद्दल मांडलेल्या कल्पना! - त्याची ही रसपूर्ण, विचारांना चालना देणारी कहाणी लेखकांनी उत्कृष्ट पद्धतीने मांडलेली आहे..देव म्हणजे परग्रहावरील अतिप्रगत जीव व त्यांनी पृथ्वीवर निर्माण केलेला जीव म्हणजे मानव हा तो सिद्धांत..
या सिद्धांताची मनोरंजक आणि माहिती या पुस्तकात दिली आहे..विज्ञानामधील एका आगळ्या वेगळ्या संशोधनाची माहिती देणारे उत्कंठावर्धक हे एक पुस्तक.. पुस्तक वाचत असताना अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये घर करून जातात व आपल्याला अनेक गोष्टींचे कुतूहल वाटते विशेषकरून (इजिप्त च्या पिरॅमिड बद्दल...)

मला कुतूहल वाटलेल्या व विचार करायला भाग पाडलेल्या काही गोष्टी......✍️❣️

१)मांसाहारी प्राणी निर्माण होताना मांजर,रानमांजर,वाघ ( तॄणाहारी मधे झेब्रा,घोडा,गाढव )ई. एकमेकांसदृश अनेक प्राणी निर्माण झाले. परंतू मानव निर्माण होताना मानवाला समांतर प्राणी नाही झाला.

२)जगातील सर्व प्राणी निशाचर अथवा दिनचर अशी वैशिष्ट्ये घेउन येतात. मानवाला तेही नाही.

३)आहाराच्या बाबतीत मांसाहारी,शाकाहारी,तॄणाहारी,कीटकाहारी ई. वैशिष्ट्ये आहेत. मानवाला नाहीत..

४)संरक्षणासाठी प्राण्य़ांना शिंगे,दात,नखे, अशी आयुधे जन्मतः लाभली आहेत. मानवाला नाहीत.

५)कोणत्याही प्राण्याचे अपत्य अल्पकाळात स्वतंत्रपणे जगू लागते. मानवाचे मात्र वर्षानुवर्षे आई-बापांवरच अवलंबुन पराधीन जिणे जगत असते.

६)सगळ्यात महत्वाचे म्हणजे सर्व प्राणी फ़क्त वर्तमानकाळात जगत असताना मानव हा एकच प्राणी असा आहे, की जो कोणतीही शारीरिक कुवत नसताना भूत-भविष्याचा विचार करीत सर्व जगावर स्वामित्व मिळवण्याचा सतत प्रयत्न करत असतो.
मानवाची उत्पत्ती जरा बाजुला ठेवली तरी काही प्रश्न पडतातच, ज्या काळात मानवाला चाकाचा शोधही लागला नव्हता त्या काळात सापडलेले बांधकाम किंवा चित्रे, शिल्पे पाहिल्यावर आश्चर्यचकीत होण्याची वेळ येते..

उदाहरण :-

१) ईजिप्तमधले पिरॅमिडस, त्यांची शास्त्रीय रचना,पायाची अशी बांधणी की  ज्यामुळे पृथ्वीवरील जमिन आणि पाणी यांची समान भागणी व्हावी,त्यांचा 'पाय' या गणितातील सर्वात स्थिर संख्येशी असलेला संबंध, पिरॅमिडच्या आतुन वर पाहीले तर एखाद्या नक्षत्रावर अथवा तार्यावर केंद्रीत होणे,पिरॅमिडमधुन किरणोत्सर्ग बाहेर पडणे...... ई.

२) ऍडमिरल पिरी रीस याने तयार केलेला जगाचा नकाशा. त्यात आत्ता आत्ता ज्याचा आकार नीट कळला आहे अशा अंटार्क्टीका चा आकार अगदी तंतोतंत आहे. खुप उंचीवर गेल्याखेरीज हे जमणार नाही. 

३) चाकाचा शोध लागला नव्हता त्या काळात या लोकांना खगोलशास्त्र आणि विमानविद्द्या अवगत होती?  

४) नाझका पठारावर दिसलेले धावपट्टीसदृश रस्ते, आणि विमान नीट उतरावे म्हणुन काढलेल्या खुणा.
अँडीज पर्वतावरील पिस्को या डोंगरावर कोरलेला प्रचंड मोठा त्रिशुळ..

५) ईस्टर आयलंड या केवळ ज्वालामुखीच्या लाव्हा रसानी बनलेल्या बेटावर असलेली पोलादापेक्षाही कठीण असलेल्या पाषाणात कातलेली शिल्पे, ज्यातील चेहरे-पट्टी ही पृथ्वीतलावरील कुठल्याही वंशाशी जुळत नाही..

६) ईजिप्तमधील स्फिंक्सची प्रतिकृती ब्राझीलमधील रिओ डि जानेरो मधे एका डोंगरावर आढळते. ह्या शिल्पाची मर्यादारेषा स्पष्ट करण्यासाठी जी फिनिशियन चित्रलिपी वापरण्यात आली आहे ती फिनिशियन जमात मध्यपुर्वेत नांदत होती.फिनिशियन लोक मध्यपुर्वेतुन येथे कसे पोचले असावेत ?

७) तसेच ईजिप्तसारखेच पिरॅमिडस मेक्सिको मधे आहेत.आणि काश्मीर मधील परिहासपुर येथील मंदीराचे भग्नावशेष पिरॅमिडस ची आठवण करुन देते. ( सर्व ठिकाणी किरणोत्सर्ग आहेच.)

या आणि अशा अनेक गोष्टी व प्रश्न या पुस्तकात नमुद केल्या आहेत..हे पुस्तक आपल्याला नक्कीच विचार करायला भाग पाडते..एक लाख मैलांपेक्षा जास्त प्रवास व्हॉन डेनिकेन यांनी केला आणि अनेक गोष्टी आपल्या संशोधनाने उजेडात आणल्या ज्या खरंच आपल्याला विचार करायला भाग पाडतात आणि थक्क करून जाते..

©️ Moin Humanist ✍️

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

थोडं मनातलं ♥️

सुपरमॅन ऑफ मालेगाव.....♥️🌼

जोगवा 💔🌼