दहशतवाद 💔
23 एप्रिल 2025 रोजी पहलगाममध्ये घडलेली भीषण घटना संपूर्ण देशाला हादरवून गेली. निरपराध नागरिकांवर झालेला हल्ला केवळ व्यक्तींवर नव्हे तर आपल्या सर्वांच्या मानवी मूल्यांवर झालेला फार मोठा आघात आहे.धर्माच्या नावावर निष्पाप लोकांचा बळी घेणे हे अत्यंत घृणास्पद नि दुःखद आहे. धर्म हा मुळात प्रेम, सहिष्णुता नि करुणेचा संदेश देतो, पण काही लोक त्याचा गैरवापर करून हिंसेचा मार्ग निवडतात. जेव्हा निरागस लोक केवळ त्यांच्या ओळखीवरून मारले जातात, तेव्हा त्यांचे कुटुंबीय कोणत्या यातना सहन करत असतील, याचा विचार केला तरी अस्वस्थ वाटतयं. आई-वडिलांचा अपत्यांवरचा जीव, लहान मुलांचा आधार हे सगळं एका क्षणात संपवलं जातं. केवळ कोणत्यातरी विकृत एका विचारसरणीमुळे संपूर्ण कुटुंब उध्वस्त होतं.💔 Terrorism हा आजच्या काळात संपूर्ण मानवजातीसाठी एक मोठा धोका बनलाय. दहशतवादाला कोणताही धर्म, देश किंवा जातीशी जोडणं चुकीचं आहे, कारण हिंसा नि भीती यांना कधीच धर्माचा आधार नसतो. दहशतवादी कारवाया जगभरात सर्वच समाजांवर घातक परिणाम घडवतात.मग ते भारतातले हल्ले असो, अमेरिकेतील 9/11 असो, फ्रान्समधले Paris attacks असो किंवा इतर कुठेही....