मी माझ्या शिक्षणासाठी आर्थिक पाठबळ कशाप्रकारे मिळवले ? 🌼
कॉलेजमध्ये निवड झाल्यानंतर जशा प्रत्येक ध्येयाच्या वाटेवर नेहमीच काही अडचणी येतात.तशाच माझ्या ध्येयाच्या वाटेवरही मोठी आर्थिक अडचण आली होती. 90% शिष्यवृत्ती मिळूनही दोन वर्षांचा खर्च तब्बल 6,89,000 रुपये येणार होता, ज्यातील 1 लाख रुपये एका आठवड्याच्या आत भरून ऍडमिशन कन्फर्म करायचे होते. हे सर्व माझ्या आवाक्याबाहेर होते. काहीही झाले तरी ऍडमिशन तर घ्यायचं होतं, पण फीचा प्रश्न डोंगरासारखा समोर उभा होता. काय करावे, हेच सुचत नव्हते. Education Loan साठी अर्ज केला होता, पण ते वेळेवर मिळणार नव्हते आणि मला एका आठवड्याच्या आत 1 लाख रुपये लागणार होते. त्या क्षणी काळजीने मनात घर केले होते. मग एक कल्पना सुचली, ती म्हणजे माझ्या संपर्कातील We Read नि पुस्तकामुळे नाळ जुडलेल्या काही निवडक व्यक्तीकडे मदत मागायची. 'पब्लिक फंडिंग' वगैरे न करता फक्त विश्वासू लोकांकडून मदत मागायची ठरवली. यासाठी 50 लोकांची यादी तयार केली आणि एक विस्तृत पोस्ट लिहिली, ज्यामध्ये एकूण सर्वकाही डिटेल्स शेअर केल्या. पहिल्यांदा 35 लोकांना मेसेज केला, त्यापैकी 32 लोकांनी लगेच पैसे पाठवले. दोन दिवसांनी शाळेतील शिक...