पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

We Read saturday ची 20 वी वाचनीय 85 पुस्तकांची यादी 💙

इमेज
https://wa.me/7066495828 __________________________________________ 1)माझे सत्याचे प्रयोग-महात्मा गांधी 225₹ घरपोच(शिपिंग फ्री) माझे सत्याचे प्रयोग ही महात्मा गांधींची आत्मकथा आहे. गांधीजींनी जीवनभर कशी वाटचाल केली ह्याचा मागोवा या पुस्तकामध्ये घेतला आहे. हे पुस्तक मराठी, हिंदी, गुजराती व इंग्रजीमध्ये उपलब्ध आहे तसेच जगभरातील अनेक भाषांमध्ये त्यांचे अनुवाद झालेले आहेत. या पुस्तकात लहानपणापासून १९२१ पर्यंतचे गांधीजींचे आयुष्य रेखाटले गेले आहे. 2)सलोख्याचे प्रदेश -सबा नक्वी मुळ किंमत - 250₹ We read किंमत - 225₹घरपोच (शिपिंग फ्री) भारतात अनेक जाती - धर्मांचे लोक राहतात. प्रत्येक समाजाच्या चालीरीती, रूढी परंपरा वेगळ्या असतात. तरी 'अनेकतात एकता' म्हणतो त्याप्रमाणे येथील प्रमुख हिंदू व मुस्लीमांच्या परंपरा, सण, उत्सव, एकत्र साजरे होतात. अशा काही ठिकाणी भेट देऊन तेथील समजाचे चित्रण सवा नक्वी यांनी 'सलोख्याचे प्रदेश' मधून दाखविले आहे. 3)चाणक्य नीती 185₹घरपोच(शिपिंग फ्री) आचार्य चाणक्यांनी त्यांचे विचार चाणक्य नीती या ग्रंथात समाविष्ट केले आहेत. या पुस्तकात आचार्य य...

फकिरा ♥️

इमेज
काही दिवसांपूर्वी 'अण्णाभाऊ साठे'यांच्या अजरामर लेखणीतून निर्माण झालेली 'फकिरा'ही कादंबरी चौथ्यांदा वाचून पूर्ण केली नि त्या कादंबरीचाच एक भाग झालो.ही कादंबरी मी वाचली नाही तर अक्षरशः जगून नि अनुभवून आलो.अण्णाभाऊ नि त्यांच्या लिखाणाला खरंच तोड नाही.'वाचावं नि फक्त वाचतचं जावं असं अफाट साहित्य त्यांनी मराठी साहित्याला दिलं आहे जे वर्षानुवर्षे वाचकांच्या हृदयात फिट्ट असेल. 35 कादंबऱ्या,13 कथासंग्रह,8 पटकथा,1 प्रवासवर्णन,3 नाटके,10 पोवाडे व 14 लोकनाट्ये आणि 12 उपहासात्मक लेख एवढं भरमसाठ दर्जेदार लिखाण करून आपल्या समाजाला आरसा दाखवण्याचं काम त्यांनी केलं आहे.आपल्या साहित्यातून त्यांनी उपेक्षित समाजाचं संघर्षमय जीवन वाचकांसमोर मांडला असून पावलोपावली शोषणाविरुद्ध आवाज त्यांनी उठवला आहे. फकिरा ही अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेली अप्रतिम अशी कादंबरी आहे.'1959 साली प्रकाशित झालेल्या या कादंबरीला 1961 मध्ये 'महाराष्ट्र सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार' मिळाला असून अण्णाभाऊंनी  डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंझार लेखणीस' ही कादंबरी अर्पण केली आहे. वि. स. खांडेक...

We Read saturday ची 19 वी वाचनीय 80 पुस्तकांची यादी 💙

इमेज
https://wa.me/7066495828 __________________________________________ 1)कोसला -भालचंद्र नेमाडे मुळ किंमत - 425₹ We read Price - 375₹घरपोच.(शिपिंग फ्री) भालचंद्र नेमाडे यांची ‘कोसला’ ही कादंबरी स्वतःचे असे वेगळेच प्रभावीपण सिद्ध करणारी आहे. आजच्या काळाचे प्रतिबिंब तिच्यात पुरेपूर उतरले असून ती केवळ एखाद्या तात्कालिक समस्येला हाताळत नाही. कादंबरीच्या आवक्याला पुरेल असाच एक मोठा विषय उकलण्याचा प्रयत्न तिच्यातून लेखकाने केला आहे. समाजाशी माणूस कसा अगतिकपणे, अजाणतेपणी गुंतलेला आहे आणि स्वतःचे असे महत्त्वपूर्ण एकटेपणच या समाजात किती दुर्लभ आहे, वरकरणी अगदी सामान्य वाटणाऱ्या जीवनक्रमातून मोठ्या भेदक रीतीने पटवून देण्याचा जो प्रयत्न नेमाडे यांनी ‘कोसला’मध्ये केला आहे तो मराठी कादंबरीच्या जगात सर्वस्वी पहिलाच मानावा लागेल. 2)गांधी उद्यासाठी~ दिलीप कुलकर्णी मुळ किंमत - 600₹ We read Price - 525₹घरपोच.(शिपिंग फ्री) 'मोहनदास करमचंद गांधी. दीडशे वर्षांपूर्वी जन्मलेला एक सामान्य माणूस आपल्या अफाट कर्तृत्वाने महात्मा बनला. आश्चर्य असे की, जाऊन सात दशके लोटली, तरी गांधी संपलेले नाहीत! त्यांचे विचार अ...