पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

अँड नाऊ मिगेल ♥️

इमेज
काही दिवसांपूर्वी 'अँड नाऊ मिगेल'ही अप्रतिम अशी 159 पृष्ठसंख्या असलेली कादंबरी वाचली.जोसेफ क्रमगोल्ड लिखित व रॉय किणीकर यांनी मराठी अनुवादित केलेली ही कादंबरी खरंच खूप छान आहे,जी वाचत असताना शेवटपर्यंत मी यामध्ये हरवून गेलो होतो.जणू मिगेल आणि त्याच्या कुटुंबाचा एक भाग झालो होतो.कादंबरीतील विविध घटना जणू मला माझ्या डोळ्यासमोर घडताना दिसतं होत्या.मेंढपाळाचं जीवन ,हजारो मेंढ्यांच्या कळपाचं पालनपोषण, तिथली हिरवीगार कुरणं, खळाळणारे झरे,मेंढपाळ कुटुंबातील चालीरीती आणि आसपासच्या निसर्गाचं वर्णन मिगेल या पात्राच्या तोंडून ऐकून मी त्याच्या भावविश्वात विरघळून गेलो.या कादंबरीतुन मेंढपाळाच्या एका वेगळ्याच विश्वाचे दर्शन आपल्याला होतात. मिगेल शावेज हा मेंढपाळांच्या एका मोठ्या मेंढपाळ कुटुंबातील 12 वर्षाचा मुलगा. जो उत्तर न्यू मेक्सिकोमध्ये, 'सांग्रो द क्रिस्तो' पर्वताच्या पायथ्याशी राहत असतो.लवकरात लवकर मोठा होण्याची घाई झालेल्या छोट्या मिगेलची एक अतृप्त इच्छा आहे.ती ही की त्याला 'सांग्रो द क्रिस्तो'या डोंगरावर जायला मिळावं.पण तो अजून लहान असल्याने त्याचे वडील त्...

झांबळ ✨💕

इमेज
मार्च महिन्याची सुरुवात 'खुलूस'या कथासंग्रहापासून तर' एप्रिल' ची सुरुवात 'झांबळ' या नवाकोरा आणि अप्रतिम असा कथासंग्रहापासून झाली.समीर गायकवाड सरांची लेखणी आणि त्यांच्या 'लिखाणाला खरंच अजिबात तोड नाहीच'.वाचकांच्या हृदयाला स्पर्श करून,आपल्या लिखाणाने वाचकाला एकाच जागी खिळवून ठेवणारी समीर सरांची लेखणी सुन्न करून जाते.सरांच्या फेसबुक पोस्ट असो किंवा आता आलेली 'खुलूस आणि  झांबळ' ही दोन्ही पुस्तके वाचकांना आपल्या प्रेमात पाडायचं काम करतात.संवेदनशील आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या या लिखाणातून माणसाला माणुसपण शिकायला मिळतो. 'झांबळ' वाचायला मी खूप उत्सूक होतो. म्हणून हाती येताच वाचायला घेतलं आणि 2 दिवसांत वाचून पूर्ण सुद्धा केलं.यातील प्रत्येक कथेने आणि कथेतील माणसांनी मला जीवन आणि आजूबाजूला बघण्याचा नवीन दृष्टीकोन दिला,माणुसकीचे दर्शन घडविले तर नितांत मनापासून प्रेम करायला शिकवले. या कथासंग्रहात एकूण 22 अप्रतिम आणि हृदयाचा ठाव घेऊन जाणाऱ्या कथा आहेत.ज्या आपल्याला अंतर्मुख करून जातात.यातील प्रत्येक पात्र आपल्या स्मरणात राहून जातो. जो ह...

We Read लायब्ररी साठी पुस्तकांची यादी.....♥️

इमेज
__________________________________________ 1)एका रानवेडयाची शोधयात्रा -कृष्णमेघ कुंटे मूल्य : 290₹ 2)द दा विंची कोड -डॅन ब्राउन  मुळ किंमत - 400₹ 3)शोध -मुरलीधर खैरनार मुळ किंमत -550₹ 4)सिद्धार्थ - हरमन हेसे मुळ किंमत - 250 5)प्रतिपश्चन्द्र -डॉ.प्रकाश कोयाडे मुळ किंमत - 380₹ 6)असुरवेद - संजय सोनवणी मुळ किंमत - 280 7)भुरा -शरद बाविस्कर मुळ किंमत - 500 8)वाट तुडवताना -उत्तम कांबळे मुळ किंमत - 250 9)महाराष्ट्रातील धबधबे -रमेश देसाई  मुळ किंमत -700₹ 10)डहान -अनिल साबळे  मुळ किंमत -450₹ 11)ऍनिमल फार्म -जॉर्ज आर्व्हल मुळ किंमत - 150 12)शहीद भगतसिंग यांची जेल डायरी - शहीद भगतसिंग मुळ किंमत - 300₹ 13)पिरॅमिडच्या प्रदेशात - डॉ. अच्युत बन  मुळ किंमत - 250₹ 14)नदिष्ट -मनोज बोरगावकर  मुळ किंमत - 200₹ 15)रावण राजा राक्षसांचा - शरद तांदळे मुळ किंमत - 390₹ 16)प्रकाशवाटा -प्रकाश आमटे मुळ किंमत - 200₹ 17)मजबुती का नाम गांधी -चंद्रकांत झटाले मुळ किंमत - 250 18)अर्थसाक्षर व्हा - अभिजित कोलपकर मुळ किंमत - 350₹ 19)चिखल घाम आणि अश्रू -बिअर ग्रील्स मुळ किंमत - 400 20)स्टार्टअपविषयी सर...