कोसला♥️

2018 साली सर्वप्रथम मी नेमाडेंची 'कोसला' वाचली होती.मुळात तेव्हा ती फक्त वाचलीच होती,मला ती समजली मात्र अजिबात नव्हती.माझी बौद्धिक पातळी म्हणा किंवा कुवत म्हणा तेव्हा तेवढी नव्हती.यामुळेच मला ही कादंबरी तेव्हा भयंकर कंटाळवाणी वाटली.अनेक वेळा अर्ध्यातच सोडून द्यावी असं वाटतं होतं,पण मी शेवटपर्यंत वाचलीच आणि पुढे काही आता याच्या नादी लागायचं नाही असं ठरवून इतर वाचन सुरू ठेवलं. कोसलाच्या अनुभवामुळेचं मी नेमाडेंच्या 'चांगदेव चतुष्ट्य" आणि हिंदुच्या वाट्याला गेलो नव्हतो. पुढे जसं जसं वाचन वाढलं,वाचनाचा आवाका वाढला तसं तसं 'नेमाडे आणि त्यांच्या पुस्तकाप्रति आकर्षण वाढतं गेलं'.नेहमी कुठे ना कुठे "कोसला आणि हिंदू" बद्दल चांगलं-वाईट वाचत आणि ऐकत होतो.पांडुरंग सांगवीकर,खंडेराव आणि चांगदेव या पात्राचें मिम्स बघत होतो.या इत्यादी कारणानेच बहुतेक मी पुन्हा 'नेमाडेंच्या वाट्याला जायचं ठरवलं.सुरुवात केली ती 'कोसला' पासून.वयाच्या पंचवीशीत लेखकांनी ही कादंबरी लिहिली तर मी पंचवीशीत ही दुसऱ्यांदा वाचली हा एक संयोगच जणू. तर,काही दिवसांपूर्वी मी कोसला वाचली आणि...