पाडस ❤️

काही दिवसांपूर्वी पाडस या अप्रतिम आणि भन्नाट अश्या कादंबरीचा माझा वाचन प्रवास समाप्त झाला.आणि मला काहीतरी वेगळं आणि हटके वाचल्याचा आनंद मिळाला.ही कादंबरी जरी "The Yearling " या कादंबरीचा मराठी अनुवाद असली तरीही कोठेही अजिबात अनुवादित वाटतं नाही. एवढं अफलातून अनुवाद राम पटवर्धन सरांनी केलेला आहे. जो उत्कृष्ट अनुवाद कसा असावा याचा एक आदर्श उदाहरण ठरतो. मुळ लेखिका मार्जोरी किनन रॉलिंग्स लिखित ही कादंबरी खूपच वाचनीय असून प्रत्येकाने वाचायलाच हवी अशी आहे. 1938 मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीत अमेरिकेतील फ्लॉरिडा संस्थानाचे एक वेगळे रूप रेखाटले आहे.यातील काळ शंभर वर्षांपूर्वीचा असून त्याकाळातील एका कुटुंबाची ही एक भावनिक आणि रोमांचक कथा आहे. मागील एक आठवड्यापासुन मी या कादंबरीच्या सानिध्यात वावरतोय.जणू मी या कादंबरीचा एक भाग झालोय असा मला भास होतोय.मी यातील कथानकात एवढा गुंतलोय की मला आजूबाजूला यातील पात्रच दिसतं आहेत. ज्योडी,पेनी, ओरी आणि इत्यादी पात्रांना मी जणू बोलतोय त्यांच्यासोबत शिकारीला जातोय,शेती करतोय व यांच्यासोबत मेजवानी करतोय असं मला वाटतंय.एकूण 416 पृष्...