शेकरा ❤️

काही पुस्तके खरंच न्यारी असतात.वाचायचं कुठलाही अंदाज नसताना आपण ती फक्त चाळायला घेतो.पण चाळता चाळता ते पुस्तक कधी वाचून संपवतो हे आपल्यासुद्धा कळत नाही.माझ्याबाबतीत हे असंच बऱ्याच वेळा झालं आहे.तर रात्री पुन्हा असंच काही घडलं.एका सरांनी मला हे पुस्तक भेट म्हणून पाठवलं.आणि इतर वाचन बाजूला ठेऊन मी रात्री एका बैठकीतच हे पुस्तक वाचून पूर्ण केलं.विविध विषयावर असंख्य कादंबऱ्या लिहिणाऱ्या रणजित देसाई सरांनी या विषयावर सुद्धा छोटीशी पण अंतमूर्ख करणारी कादंबरी लिहिली असेल याचा मी पूर्वी विचारच केला नव्हता.हे पुस्तक वाचून मला एक सुखद धक्का बसला. ते पुस्तक म्हणजे रणजित देसाई यांची अखेरची अभिव्यक्ती आणि एक विलक्षण लघु कादंबरी असलेली शेकरा ही होय.एकूण फक्त 76 पृष्ठसंख्या असलेली ही लघु कादंबरी प्रत्येक सुजाण वाचकास अंतर्मुख करणारी आहे.जंगलाची व तेथील घडणाऱ्या घटनांची एक सुंदर सफर घडवून आणते.जे वाचत असताना आपण आजूबाजूचं भान विसरून यामध्ये हरवून जातो.शेकरा या कादंबरीने जंगलातील जीवनाचे अनुभवविश्व साकारले आहे.ही छोटीशी पण गोंडस कादंबरी वाचत असताना आपण जणू जंगल विश्व प्रत्यक्षात बघतोय,अनुभवतोय असा भास आ...