वॉल्डनकाठी विचार विहार 💜

हेन्री डेव्हीड थोरो म्हणजे निव्वळ थोर आणि अफलातून माणूस हा माझा ठाम मत आहे.माझे गुरू.निसर्ग,पर्यावरणाच्या बाबतीत त्यांच्या विचारांचा मी जबरदस्त चाहता आणि त्यांचा डायहार्ड फॅन आहे. सर्वात प्रथम जर कोण्या विचारवंताने निसर्ग/पर्यावरणाचा विचार केला असेल आणि आपल्या विचारांवर अंमल केला असेल तर तो आपल्या थोरो गुरुजींनीच.२ वर्ष २ महिने २ दिवस कंकाॅर्डजवळच्या वॉल्डन नामक तळ्याकाठी जंगल/रानात एकट्याने वास्तव्य करून तेथे त्यांनी काय केले,कोणता व्यवसाय केला,त्यांना एकटेपणा वाटला नाही का ?? इत्यादी काही कुतूहल असलेल्या प्रश्नाचे उत्तरे त्यांनी वॉल्डन या पुस्तकात दिले आहे.आपले तेथील अनुभव सांगता सांगताच जीवनातील अनेक समस्यांविषयीचे आपले विचारही त्यांनी या पुस्तकात व्यक्त केले आहेत जे वाचून आपण विचारांच्या चक्रात गुंतून गेल्याशिवाय राहत नाही. आपल्या रानात राहायला जाण्याबद्दल थोरो गुरूजी म्हणतात, 'मी रानात राहायला गेलो तो अशासाठी, की जीवन हेतुपुरःसर जगावे, जीवनाच्या मूलभूत तथ्यांना सामोरे जावे, जे इतरांना शिकवायचे ते आपल्या स्वतःला शिकता येते की नाही ते पाहावे, आणि मरतेवेळी आपण जगलोच न...