ययाती....💖
काही महिन्यांपूर्वी म्हणजेच कॉलेज जाण्यापूर्वी वि. स. खांडेकर सरांची हि बहुचर्चित कादंबरी प्रथमच फक्त वाचली नव्हती तर अनुभवली सुध्दा होती.तेव्हापासुन मला याबद्दल माझा अनूभव लिहायचं होतं नि तो आज पुर्ण करतोय . तर ययाती मला हि कथा फक्त एका राजाची नाही तर आपल्यासारख्या प्रत्येक माणसाच्या मनातल्या इच्छा, मोह नि पश्चातापाची वाटली . या कादंबरीत ययाती नावाच्या राजाचं आयुष्य, त्याच्या आयुष्यात आलेल्या दोन स्त्रिया म्हणजेच देवयानी व शर्मिष्ठा, त्यांचे नाते नि त्यातून निर्माण झालेले संघर्ष खूप सुंदरपणे मांडले आहेत. देवयानी ही अहंकारी नि महत्वाकांक्षी तर शर्मिष्ठा ही त्याग करणारी नि प्रेमळ असते . या दोन वेगळ्या स्वभावाच्या स्त्रियांमुळे ययातीच्या आयुष्यात मोठी उलथापालथ होते नि आपल्याला या कादंबरीतुन वाचायला मिळते . कथेतील सर्वात महत्त्वाचा भाग आहे तो म्हणंजे ययाती राजाला मिळालेला वृद्धत्वाचा शाप. शर्मिष्ठेसोबतचे संबंध उघड झाल्यावर देवयानीचे वडिल म्हणजेच शुक्राचार्य ययातीला म्हातारपणाचा शाप देतात.पण अचानक म्हातारा झाल्यावरही ययातीच्या मनातल्या इच्छा काही संपत नाहीत. तो आपल्या मुलांना व...