पोस्ट्स

गुरू आयोनि लडका मराठी पुस्तक अनुभव 💫🌼 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

गुरू आयोनि लडका...❤️

इमेज
किशोर बळी यांची "गुरू आयोनि लडका" ही अवघ्या 104 पानांची पण अंतर्मनाला हादरवणारी नि आतून विचार करायला लावणारी कादंबरी नुकतीच वाचली. पारधी तांड्यातील एका लहानशा जिल्हा परिषद शाळेची नि त्या शाळेत आलेल्या एका नवख्या शिक्षकाची ही गोष्ट आहे. पण ही फक्त एका शिक्षकाची गोष्ट नाही तर ही आहे त्या शिक्षकाच्या मनात चाललेल्या अस्वस्थतेची, शाळेशी अन् विद्यार्थ्यांशी निर्माण झालेल्या नात्याची व शिक्षणव्यवस्थेच्या ढासळलेल्या वास्तवाची. कादंबरीची पार्श्वभूमी यवतमाळ जिल्ह्यातील गणेशपूर गावातील पारधी तांडा ही आहे जिथे अजूनही गरिबी, अंधश्रद्धा, शिक्षणापासून दूर राहिलेली मुले नि गावकऱ्यांमध्ये असलेली शंका, अविश्वास नि वेगळेपणाचे दुःख दिसून येते. इथे एक शिक्षक येतो नि तो 'गुरुजी' म्हणून पोऱ्यांच्या आणि गावकऱ्यांच्या जीवनात थोडंसं उजेडाचं पाणी शिंपडतो. पण हा प्रवास सोपा नाही, ना सहज घडणारा. शिक्षक म्हणून रुजू झाल्यावर त्याला केवळ अध्यापन करायचं नसतं, तर मुलांना शाळेच्या दिशेने ओढून आणायचं असतं, त्यांचे प्रश्न समजून घ्यायचे असतात, गावकऱ्यांशी संवाद साधायचा असतो. एकेक दिवस जातो तसं...