पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२५ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माझा वाचनप्रवास...❤️

इमेज
वाचन आज माझ्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. माणसाच्या विचारसरणीवर, व्यक्तिमत्त्वावर नि संपूर्ण आयुष्यावर वाचनाचा खोलवर परिणाम होतो. इतिहासात अनेक थोर व्यक्तींनी केवळ वाचनाच्या जोरावर आपलं जीवन घडवलं आहे. माझ्यासारख्या सामान्य विद्यार्थ्याचं आयुष्यही वाचनामुळेच बदललं आहे. चांगली पुस्तके जगण्याचा नवा दृष्टिकोन देतात, आपल्या विचारांना एक नवी दिशा देतात, बौद्धिक नि भावनिक समृद्धी वाढवतात. "आपण जेव्हा वाचन करत नाही, तेव्हा आपलं आयुष्य सीमित राहतं; आपण चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करत नाही. माहिती आपल्याला अनेक ठिकाणाहून मिळते, पण खरी समज नि शहाणपण पुस्तकांमधूनच मिळतं. अनुभवाच्या समृद्धीने हे ज्ञान अधिक दृढ होतं, तेव्हा आपलं आयुष्य खऱ्या अर्थाने समृद्ध होतं जातं असं मला वाटतं. माझ्या आयुष्यातही हेच घडलं. पुस्तकांनी मला दिशा दिली, मार्गदर्शन केलं नि माझ्या आयुष्याला एक वेगळी ओळख दिली. मी केवळ शिकत गेलो नाही, तर जगणंही समजत गेलो. वाचनाच्या या प्रेमामुळेच मला ‘स्वप्नील कोलते साहित्य पुरस्कार’ मिळाला. हा पुरस्कार प्रथमच एका वाचकाला देण्यात आला होता. माझ्यासाठी हा केवळ सन्मान...