मनाने अफाट श्रीमंत असलेला माझा मामा ✨♥️
माझ्या आयुष्यात नातेवाईकांना विशेष काही महत्व नाही.कारण त्यांनी कधी नातेवाईक असण्याचं कर्तव्य निभावल्याचं मला आठवत नाही.मायेने जवळ घेऊन कधी आपलेपणाची जाणीव आजपर्यंत विशेष अशी कोणीही करून दिलेली नाही.माझ्या 'सुखा-दुःखात',अडीअडचणीत कधीही नातेवाईकांचा विशेष रोल राहिलेला नाही.म्हणायला बरेच नातेवाईक असून सुद्धा विशेष जवळचा म्हणण्यासारखा मला सुरुवातीपासून एकही वाटतं नाही.अपवाद माझी दिवंगत 'नानी माँ' नि माझा मामा. (आजी आजोबांना[वडिलांचे आई-वडील]तर मी बघूच शकलो नाही.) आजी (नानी)आज हयात नाही ती 2021 मध्येच वारली.पण तिने दिलेला प्रेम कायम आठवणीत राहणार माझ्या.तर मामाने सुद्धा आम्हाला आजीच्या प्रेमाची कमी मात्र आजपर्यंत पडू दिली नाही.✨ माझ्या सुखात दुःखात मामा नेहमीच हजर राहिलेला आहे.त्याची हालाखीची परिस्थिती असताना सुद्धा तो त्याचा प्रेम नि काळजी कमी पडू देत नाही.वेळोवेळी विचारपूस करणे,कोठेही गेलो तर सतत कॉल करून काळजी घेणे नि काहीही झालं तर एका कॉलवर हजर असणे ही मामाची फार जमेची बाजू आहे.वेळोवेळी मामाने आम्हाला खूप साथ दिली आहे नि देत असतो.म्हणूनच मामा मला फार जवळचा...