माहितीसाठी 🌾✨
अनेक जण विचारत असतात की मी बंकर मधील पुस्तकांची काळजी कशी घेतो ?✨♥️ खालीलप्रमाणे मी काही लाकडी रॅक विकत घेतल्या आहेत नि त्या रॅक व्यवस्थित बंकर मध्ये लावल्या आहेत.मुद्देसुद पुस्तकांचे वर्गीकरण करून रॅकच्या कप्प्यात न्यूजपेपर लावून त्यामध्ये उभी-आडवी पुस्तके सुव्यवस्थित रचली आहेत. यानंतर तिन्ही रॅकच्या मापाच 'ट्रान्स्पेरेंट प्लास्टिक कव्हर' आणलं नि ते रॅकच्या समोर एकाद्या पडद्याप्रमाणे लावलं आहे.या प्लॅस्टिक कव्हरमुळे पुस्तकांवर धूळ बसतं नाही किंवा बंकरची साफ सफाई करताना पाणी वगैरे सुद्धा उडत नाही.यासोबतच पुस्तकं शोधायला अडचण येत नाही,ट्रान्सप्रेरेंट असल्याने कव्हर लावलेलं आहे हे सहसा नजरेत पडतं सुद्धा नाही. वेळ मिळेल त्याप्रमाणे मी महिन्या/ दिडमहिन्यात वेळोवेळी पुस्तके काढून साफ करत असतो.'वाचलेली पुस्तके आत ठेऊन वाचायची असलेली पुस्तके बाजूला काढत असतो.🧡