पोस्ट्स

जानेवारी, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

मुकद्दर 🌼💜

इमेज
स्वप्नील कोलते-पाटील लिखित मुकद्दर ही कादंबरी काही दिवसांपूर्वी मी दुसऱ्यांदा वाचून पूर्ण केली. प्रथम ही कादंबरी जेव्हा प्रकाशित झाली, तेव्हा लगेच मागवून वाचली होती. पण तेव्हा जाणूनबुजून याबद्दल काहीच लिहिलं नव्हतं. कारण, मुखपृष्ठावरील औरंगजेबाचे चित्र पाहून अनेकांनी एक चुकीची समजूत करून घेतली होती की,"ही कादंबरी औरंगजेबाचे उदात्तीकरण करते वगैरे.म्हणून मी ठरवलं होतं की, थोडा काळ जाऊ दे, शांतपणे आपला अनुभव लेखकांपर्यंत पोचवू. पण आज मनात सलते की, ते शक्यच झालं नाही. स्वप्नील सर आपल्यात राहिले नाहीत नि आपण त्यांच्याशी कधीच संवाद साधू शकलो नाही, याची खंत कायम राहणार आहे. "महाराज समजून घ्यायचे असतील, तर आधी औरंगजेब समजून घ्या" गुरुवर्य दुर्गमहर्षी प्रमोद मांडे सरांचे हे वाक्य जणू या कादंबरीची प्रस्तावना आहे. मुकद्दर ही औरंगजेबाच्या चरित्रावर आधारित नसून, त्याच्या व्यक्तिमत्त्वाचा 'दुसरा पैलू' उलगडून दाखवते एक असा पैलू जो इतिहासाच्या मुख्य प्रवाहात क्वचितच दिसतो.कादंबरी वाचताना कुठेही औरंगजेबाचे उदात्तीकरण जाणवत नाही. उलट, अत्यंत अभ्यासपूर्वक नि वस्तुनिष्ठत...

मीच आहे माझ्या जीवनाचा शिल्पकार ❤️

इमेज
  माझे चौथी पर्यतचे शिक्षण हे गावातील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत झालेले आहे...या शाळेत मी खूप काही शिकलो मला अनेक अनुभव या शाळेतून मिळाले... एकंदरीत या शाळेने मला घडवले असे मी मानतो कारण या शाळेतुन मला जे अनुभव/शिक्षण/संस्कार मिळाले होते तर मला एखाद्या इंग्रजी कॉन्व्हेंट शाळेत अजिबात मिळाले नसते..या शाळेतून मला एक शिस्त लागली व अभ्यासाची आवड येथूनच निर्माण झाली/इतिहास व इतर काही विषयाची गोडी येथूनच लागली..मला जेव्हा पहिलीमध्ये शाळेत टाकलं होतं तेव्हा मी एक वर्ष शाळेत गेलोच नाही म्हणून मी माझ्या मित्रांपासून एक वर्ष मागे पडलो जेव्हा माझे मित्र दुसरीत गेले तेव्हा मी पहिलीत जात होतो...अशा प्रकारे माझं या शाळेतील प्रवास सुरु झाला व मी आता नियमितपणे शाळेत जाणे सुरू केले होते...पहिली व दुसरीत असताना घरची आर्थिक परिस्थिती ही खूप वाईट होती त्यामुळे घरी पोटभर जेवायला सुद्धा मिळत नसे त्यामुळे मी मधल्या सुट्टीत मिळणाऱ्या खिचडीच्या आशेने शाळेत जायचो..पहिलीच मला मला आठवत नाही पण दुसरीमध्ये माझा शाळेत दुसरा क्रमांक आला होता तेव्हा सरांनी पेढे मागितले होते तेव्हा वडिलांच्या जवळ पेढ्याला सुद्धा...